केपटाऊन SA vs PAK 2nd ODI Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा वनडे सामना आज म्हणजेच 19 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स इथं खेळवला जाणार आहे.
T20 मालिकेत यजमान आफ्रिकेचा विजय :दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 असा आरामात विजय मिळवला. यजमानांनी सेंच्युरियन T20I मध्ये पाहुण्यांना सात गडी राखून पराभूत करण्यापूर्वी सलामीचा T20 सामना 11 धावांनी जिंकला होता. तर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 सामना पावसामुळं रद्द झाला.
पहिल्या वनडेत काय झालं : पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्ताननं यजमान दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 239 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताननं 49.3 षटकांत 7 गडी गमावून लक्ष्य गाठलं. यासह पाहुण्या संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा वनडे सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेची नजर मालिकेत बरोबरी करण्याकडे असेल. तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
तीन वर्षांपूर्वी मालिका विजय :यापुर्वी पाकिस्ताननं 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यात पाहुण्या पाकिस्ताननं 2-1 नं मालिका जिंकली होती. तर त्यापुर्वी म्हणजेच जानेवारी 2019 मध्ये शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळवला होता. आता मालिकेतील पहिला सामान जिंकल्यानं पाकिस्तानकडं आजचा दुसरा सामना जिंकत 3 वर्षांनी मालिका जिंकण्याची संधी आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका वनडे फॉरमॅटमध्ये 84 वेळा आमनेसामने आले आहेत. या 83 वनडे सामन्यांपैकी 31 पाकिस्ताननं जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेनं 52 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना संपला.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?