महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्मृती 'रेकॉर्ड ब्रेक' मंधाना... एका शतकी खेळीत केले अनेक विक्रम - SMRITI MANDHANA

आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्मृती मंधानानं 80 चेंडूत 135 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान तिनं अनेक रेकॉर्ड मोडले.

Smriti Mandhana
स्मृती मंधाना (BCCI Women X Handle)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 15, 2025, 5:20 PM IST

राजकोट Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंनधा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. राजकोटमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात स्मृती मंनधानानं तुफानी शतक झळकावलं. मंनधानानं फक्त 70 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि यासह महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला. मंनधानानं भारतासाठी महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. यासह तिनं हरमनप्रीतचा सर्वात जलद शतकाचा विक्रम मोठ्या फरकानं मोडला. यापूर्वी हरमनप्रीतनं 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 87 चेंडूत शतक झळकावलं होतं.

10 शतकं करणारी पहली भारतीय महिला : स्मृती मानधनाच्या वनडे कारकिर्दीतील हे 10 वं शतक आहे. यासह, भारतीय सलामीवीर फलंदाज वनडे क्रिकेटच्या इतिहासात 10 शतकं करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. एवढंच नाही तर महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात 10 किंवा त्याहून अधिक शतकं करणारी ती जगातील चौथी खेळाडू बनली आहे.

महिला वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं :

  • 15 - मेग लॅनिंग
  • 13 - सुझी बेट्स
  • 10 - टॅमी ब्यूमोंट
  • 10 - स्मृती मानधना

मंधाना उत्तम फॉर्ममध्ये : सलग 10 डावांमध्ये मंनधानाचा हा आठवा 50+ स्कोअर आहे. यावरुन, ती किती उत्तम फॉर्ममध्ये आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. या संपूर्ण मालिकेत मंधानाला तरुण सलामीवीर प्रतीका रावलकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. या तिसऱ्या वनडे सामन्यात दोघांनी पहिल्या विकेटसाठी 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे.

भारतासाठी महिला वनडे सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक (चेंडूंच्या बाबतीत) :

  • 70 - स्मृती मानधना विरुद्ध आयर्लंड, राजकोट, 2025
  • 87 - हरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बेंगळुरू, 2024
  • 90 - हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डर्बी, 2017
  • 90 - जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध आयर्लंड, राजकोट, 2025
  • 98 - हरलीन देओल विरुद्ध वेस्ट इंडिज, वडोदरा, 2024

वनडेमध्ये सर्वाधिक षटकार : 80 चेंडूत 135 धावा करुन मंधाना पॅव्हेलियनमध्ये परतली. या वादळी शतकी खेळीत तिनं 7 गगनचुंबी षटकार आणि 12 चौकार मारले. अशाप्रकारे, त्याने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. आता मंधाना आणि हरमनप्रीत यांच्याकडे समान 52-52 षटकार आहेत. या खेळीदरम्यान, मंनधानानं महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पेरीला मागं टाकलं. मंधानानं आता 97 वनडे सामन्यांमध्ये 4195 धावा केल्या आहेत तर पेरीनं 4185 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

  1. 432/5... भारतीय संघानं उभारला हिमालय, जे पुरुषांनाही जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं
  2. यजमान संघ 'विजयी पतंग' उडवत पाहुण्यांना 'क्लीन स्पीप' करणार? शेवटची मॅच 'इथं' पाहा लाईव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details