मुंबई International Masters League :आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी लवकरच सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरु होईल तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेदरम्यान, एक मोठी लीग खेळवली जाईल ज्यात सचिन तेंडुलकरसह क्रिकेट जगतातील मोठे स्टार सहभागी होतील. आपण इंटरनॅशनल मास्टर्स लीगबद्दल बोलत आहोत, ज्यात भारतासह 6 संघ सहभागी होतील.
कुठं होणार सामने :या लीगमध्ये भारताव्यतिरिक्त श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचं झालं तर, ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत खेळवली जाईल. ही स्पर्धा 22 फेब्रुवारी रोजी सुरु होईल तर अंतिम सामना 16 मार्च रोजी खेळला जाईल. सर्व सामने नवी मुंबई, वडोदरा आणि रायपूर इथं खेळवले जातील.
भारतीय संघाची घोषणा :या स्पर्धेसाठी आतापर्यंत तीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. भारतीय संघाचं नेतृत्व महान सचिन तेंडुलकर करणार आहे. तर, श्रीलंकेचं नेतृत्व कुमार संगकारा करेल. ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व शेन वॉटसन करेल. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, भारतीय संघात युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, अंबाती रायुडू, नमन ओझा, विनय कुमार, धवल कुलकर्णी अशी मोठी नावं आहेत.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी-20 साठी भारतीय संघ : सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, विनय कुमार, शाहबाज नदीम, राहुल शर्मा, प्रज्ञान ओझा, पवन नेगी, गुरकीरत मान, मिथुन मन्हास.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी-20 साठी श्रीलंकेचा संघ : कुमार संगकारा (कर्णधार), रोमेश कालुविथरणा, कुमार संगकारा (कर्णधार), रमेश कालुविथरणा, आसन प्रियांजन, उपुल थरंगा, नुवान प्रदीप, लाहिरू थिरामणे, चिंताका जयसिंघे, सीकुगे प्रसन्ना, जीवन मेंडिस, इसुरु उदाना, धम्मिका प्रसाद, सुरंगा लकमल, दिलरुवान परेरा, एस्ला गुणरत्ने, चतुरंगा डी सिल्वा.