महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL प्रमाणे आजपासून सुरु होणार नवी लीग; 'फ्री'मध्ये 'इथं' पाहा लाईव्ह मॅच - SA T20 LIVE

SA20 चा तिसरा हंगाम आज 9 जानेवारीपासून सुरु होईल. याचा अंतिम सामना 8 फेब्रुवारीला होणार आहे.

SA T20 Live in India
IPL च्या धर्तीवर आजपासून सुरु होणार नवी लीग (Etv Bharat)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 9, 2025, 4:30 AM IST

केपटाऊन SA T20 Live in India : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेद्वारे SA20 लीग आयोजित केली जाते. ही लीग 2023 मध्ये सुरु झाली होती आणि तेव्हापासून तिचे दोन हंगाम पूर्ण झाले आहेत आणि दोन्ही वेळा एडन मॅक्रॅमच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केप संघानं विजेतेपद पटकावलं आहे. आता SA20 चा तिसरा हंगाम 9 जानेवारीपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. SA20 च्या या हंगामात एकूण 6 संघ सहभागी होतील. सर्व संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे.

अंतिम सामना 8 फेब्रुवारीला : SA20 च्या या हंगामात 9 जानेवारी रोजी सनरायझर्स इस्टर्न केप आणि MI केपटाऊन यांच्यातील लीग टप्प्यातील सलामीच्या सामन्यासह एकूण 34 सामने असतील. लीग टप्प्यातील शेवटचा सामना 2 फेब्रुवारीला होईल. तर 8 फेब्रुवारीला जोहान्सबर्ग येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना खेळवला जाईल. सनरायझर्स इस्टर्न केप संघाची नजर पुन्हा एकदा विजेतेपदावर असेल.

SA20 च्या 2025 हंगामात भाग घेणारे संघ आणि त्यांचे कर्णधार :

  • डर्बन सुपर जायंट्स - केशव महाराज
  • जॉबर्ग सुपरकिंग्स - फाफ डु प्लेसिस
  • एमआय केप टाउन - रशीद खान
  • पार्ल रॉयल्स - डेव्हिड मिलर
  • प्रिटोरिया कॅपिटल्स - रिले रौसो
  • सनरायझर्स ईस्टर्न केप - एडन मार्कराम

भारतात SA20 लीगचे सामने कसे आणि कुठं पाहावे : क्रिकेट चाहत्यांना SA20 च्या 2025 सीझनचे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारतात थेट पाहता येतील. तर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी, भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार ॲप डाउनलोड करावे लागेल. जिथं चाहते SA20 सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.

SA20 2025 हंगामासाठी सर्व संघ :

  • डर्बन सुपर जायंट्स : ब्रँडन किंग (वेस्ट इंडिज), क्विंटन डी कॉक, नवीन-उल-हक (अफगाणिस्तान), केन विल्यमसन (न्यूझीलंड), ख्रिस वोक्स (इंग्लंड), प्रेनलन सुब्रायन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, नूर अहमद (अफगाणिस्तान), हेनरिक क्लासेन, जॉन -जॉन स्मिट्स, वियान मुल्डर, ज्युनियर डाला, ब्राइस पार्सन्स, मॅथ्यू ब्रिट्झके, जेसन स्मिथ, मार्कस स्टॉइनिस (ऑस्ट्रेलिया), शामर जोसेफ (वेस्ट इंडिज), सीजे किंग (रूकी).
  • जोबर्ग सुपर किंग्स : फाफ डू प्लेसिस, मोईन अली (इंग्लंड), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), महेश तिक्षना (श्रीलंका), डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड), जेराल्ड कोएत्झी, डेव्हिड विसे (नामिबिया), लुईस डू प्लॉय (इंग्लंड), लिझाद विल्यम्स, नँद्रे बर्जर, डोनोव्हन फरेरा, इम्रान ताहिर, सिबोनेलो मखान्या, तबरेझ शम्सी, विहान लुब्बे, इव्हान जोन्स, डग ब्रेसवेल (न्यूझीलंड), जेपी किंग (रूकी).
  • एमआय केपटाउन : राशिद खान (अफगाणिस्तान), बेन स्टोक्स (इंग्लंड), कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), अजमातुल्ला ओमरझाई (अफगाणिस्तान), डेवाल्ड ब्रेविस, रायन रिकेल्टन, जॉर्ज लिंडे, नुवान थुशारा (श्रीलंका), कॉनर एस्टरहुइझेन, डेलानो पोटगीर, रॅसी वेन डर दुसेन, थॉमस कोबर, ख्रिस बेंजामिन (इंग्लंड), कॉर्बिन बॉश, कॉलिन इंग्राम, रीझा हेंड्रिक्स, डेन पिएड, ट्रिस्टन लुस (रूकी).
  • प्रिटोरिया कॅपिटल्स : ॲनरिक नॉर्टजे, जिमी नीशम (न्यूझीलंड), विल जॅक (इंग्लंड), रहमानउल्ला गुरबाज (अफगाणिस्तान), लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड), विल स्मीड (इंग्लंड), मिगुएल प्रिटोरियस, रिले रुसो, इथन बॉश, वेन पारनेल, सेनुरान मुथुसामी, के. वेरेन, डॅरिन डुपाव्हिलन, स्टीव्ह स्टोक, टियान व्हॅन वुरेन, मार्कस अकरमन, एविन लुईस (वेस्ट इंडीज), काइल सिमंड्स, कीगन लियॉन-कॅशेट (रूकी).
  • पर्ल रॉयल्स :डेव्हिड मिलर, मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान), सॅम हेन (इंग्लंड), जो रुट (इंग्लंड), दिनेश कार्तिक (भारत), क्वेना माफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस, ब्योर्न फोर्टुइन, लुंगी एनगिडी, मिशेल व्हॅन बुरेन, कीथ डजॉन, नकाबा पीटर, एंडिले फेहलुकवायो, कोडी जोसेफ, जॉन टर्नर (इंग्लंड), दयान गालीम, जेकब बेथेल (इंग्लंड), रुबिन हरमन, दिवाण मराइस (रूकी).
  • सनरायझर्स ईस्टर्न केप : एडन मार्कराम, जॅक क्रॉली (इंग्लंड), रोएलॉफ व्हॅन डर मर्वे (नेदरलँड), लियाम डॉसन (इंग्लंड), ओटनीएल बार्टमन, मार्को जेन्सन, बेअर्स स्वानेपोएल, कॅलेब सेलेका, ट्रिस्टन स्टब्स, जॉर्डन हरमन, पॅट्रिक क्रुगर, क्रेग ओव्हरटन (इंग्लंड), टॉम एबेल (इंग्लंड), सायमन हार्मर, अँडिले सिमेलेन, डेव्हिड बेडिंगहॅम, ओकुहले सेले, रिचर्ड ग्लीसन (इंग्लंड), डॅनियल स्मिथ (रूकी)

हेही वाचा :

  1. पाकिस्तान क्रिकेटला दहशतवादी हल्ल्याची भीती; PSL बाबत अचानक घेतला मोठा निर्णय
  2. 'कीवीं'विरुद्ध लंकन गोलंदाजाची पहिलीच हॅट्ट्रिक... 4 विकेट घेत केले अनेक रेकॉर्ड; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details