चेन्नई Playing 11 for 2nd T20I : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना 25 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. कोलकाता इथं खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियानं सात विकेट्सनं जिंकला. आता भारत दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर झाली आहे. इंग्लंड संघानं सामन्याच्या एक दिवस आधी एक मोठी घोषणा केली आहे.
Brydon Carse has replaced Gus Atkinson for the 2nd T20i Vs India. pic.twitter.com/KzxrzbY2Mk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 24, 2025
गस अॅटकिन्सन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर : इंग्लंड संघानं मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. जे 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं जाहीर केलं आहे की पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी एक बदल करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस अॅटकिन्सन खेळणार नसल्याचं वृत्त आहे. त्याच्या जागी ब्रायडन कार्सला संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात गस अॅटकिंग्सनं 2 षटकं गोलंदाजी केली आणि 38 धावा दिल्या. तसंच, त्याला कोणतंही यश मिळालं नाही. गस अॅटकिन्सन हे फलंदाजीसाठी देखील ओळखले जातात. पण त्या सामन्यात तो तिथंही काही खास कामगिरी करु शकला नाही. भारताविरुद्ध त्यानं 13 चेंडूत फक्त दोन धावा काढल्या आणि बाद झाला.
जेमी स्मिथ संघाचा 12 वा खेळाडू : इंग्लंडकडून इतर कोणत्याही बदलांबद्दल अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र जेमी स्मिथ 12 वा खेळाडू असेल असं म्हटलं आहे. जो गरज असेल तेव्हाच मैदानात येईल. पहिला सामना वाईटरित्या गमावल्यानंतर, संघात बदल होण्याची शक्यता होती आणि तेच घडले आहे. इंग्लंडसाठी समस्या अशी आहे की जर त्यांनी दुसरा सामनाही गमावला तर मालिका बरोबरी करणं खूप कठीण होईल. म्हणूनच ते सुरुवातीलाच त्यांच्या सर्वात मोठ्या आणि बलवान खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत आहेत.
🚨 Team news for tomorrow's second T20I v India
— England Cricket (@englandcricket) January 24, 2025
🔁 Brydon Carse comes in for Gus Atkinson
🆕 Jamie Smith has also been added to the 12 player squad pic.twitter.com/Fr4Hju00qs
जॉस बटलरची चांगली कामगिरी : कर्णधार जॉस बटलर वगळता इंग्लंडचा कोणताही फलंदाज पहिल्या सामन्यात विशेष काही करु शकला नाही. जॉस बटलरच्या 44 चेंडूत 68 धावांमुळंच संघ 132 धावा करु शकला, अन्यथा संघ आणखी अडचणीत आला असता. जर इंग्लंडनं चांगली गोलंदाजी केली असती तर सामना चुरशीचा झाला असता, परंतु त्यांच्या गोलंदाजीतही अनेक कमकुवतपणा दिसून आला आणि भारतानं केवळ 12.5 षटकांत सामना जिंकला आणि मालिकेत आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा संघ कसा कामगिरी करतो हे पाहणं बाकी आहे.
दुसऱ्या T20 सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन : बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडेन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.
हेही वाचा :