नेल्लोर (आंध्र प्रदेश) Rubik's Cube Solving World Record : आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लोर येथील एका मुलानं रुबिक्स क्यूबमध्ये गिनीज रेकॉर्ड केला आहे. हा मुलगा रुबिक्स क्यूब काही क्षणात सोडवते. या खेळात त्यानं एक विश्वविक्रम केला. याशिवाय तो अभ्यासातही प्रावीण्य मिळवतो आणि फुटबॉल स्पर्धांमध्येही भाग घेतो. हा उत्साही मुलगा सतत नवनवीन कल्पनांसह तांत्रिक बाबींवर प्रभुत्व मिळवून आपलं कौशल्य वाढवत असतो. नयन मौर्य असं या मुलाचं नाव आहे.
रुबिक्स क्यूबची सुरुवात अमेरिकेत : नयन मौर्य हा कुटुंबासह काही वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. मात्र 2020 तो कुटुंबासह भारतात आला. अमेरिकेत राहत असताना शाळेत रुबिक्स क्यूब खेळताना मित्रांना पाहून नयनला त्याची आवड निर्माण झाली. यानंतर नयनच्या पालकांनी त्याला त्याच्या वाढदिवशी रुबिक्स क्यूब भेट दिलं. यावर गिनीज रेकॉर्डधारक नयन मौर्य म्हणाला, 'मी अमेरिकेत 5 वर्षे राहिलो. मी माझ्या मित्रांना रुबिक्स क्यूबची कोडी सोडवताना पाहिलं. तेव्हा माझी आवड निर्माण झाली. मला वाटलं की मी त्यात चांगला विक्रम करेल. मी लहानपणापासून या खेळाचा सराव करत आहे. अशा प्रकारे मला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळालं'.
नयन मौर्याचा रुबिक्स क्यूबमध्ये गिनीज रेकॉर्ड : अमेरिकेतून भारतात आल्यानंतर नयनचा रुबिक्स क्यूबमध्ये रस वाढला. त्याच्या आईनं त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याला 20 प्रकारचे रुबिक्स क्यूब्स घेउन दिले. प्रथम त्यानं गेमच्या अल्गोरिदममधून तंत्र शिकलं. मग कमी वेळात कोडी सोडवण्यात प्राविण्य मिळवलं. यानंतर नयननं अनेक ठिकाणी आयोजित रुबिक्स क्यूब पझल स्पर्धा जिंकली. खेळातील आवडीमुळं नयन क्युबर्स असोसिएशनचा सदस्य झाला. त्यामुळं त्याला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. खात्री पटल्यानंतर या मुलानं गिनीज रेकॉर्ड पाहिला आणि त्यासाठी एक नवीन कल्पना तयार केली. सायकल चालवताना क्यूब सोडवण्याचा त्यानं सराव केला. त्यानं स्वत:ला तयार केलं आणि चेन्नई इथं झालेल्या स्पर्धा जिंकून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरलं. तेही पहिल्याच प्रयत्नात त्यानं सायकल चालवताना 59 मिनिटांत 271 रुबिक्स क्यूब्स सोडवून सर्वांना आश्चर्यचकित केलं.