अहमदाबाद -नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थाननं (RR) 4 गडी राखून बंगळुरूवर (RCB) विजय मिळविला. बंगळुरूनं दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवून बंगळुरूला आयपीएल स्पर्धेतून बाहेर काढले.
संपूर्ण सामन्यात राजस्थानच्या खेळाडुंनी चांगली कामगिरी करत आरसीबीच्या खेळाडूंवर चांगलाच दबाव निर्माण केला. आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सनं 19 षटकांत 6 गडी गमावून 174 धावा करत सहजरित्या सामना जिंकला. या पराभवामुळे आरसीबीला आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देण्याचे विराट कोहलीचे स्वप्न झाले. पराभव झाल्यानं आरसीबी संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला. ऑफस्पिनर रविचंद्रन ४ षटकात केवळ १९ धावा देत २ बळी घेतले. राजस्थानला विजय मिळवून देत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या अश्विनला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. राजस्थान रॉयल्सचा आता चेन्नई येथील सामन्यात क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी सामना होणार आहे. तर चेन्नईतील क्वालिफायर 2 सामन्यातील विजेत्याचा सामना रविवारी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.
RR vs RCB IPL 2024 :आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 विकेट गमावून 172 धावा केल्या. या सामन्यात आरसीबीकडून रजत पाटीदारने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 34 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 33 आणि महिपाल लोमरने 32 धावांचं योगदान दिलं. या फलंदाजांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि कॅमेरून ग्रीन 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला तर दिनेश कार्तिकने केवळ 11 धावा केल्या. या सामन्यात आवेश खानने 3, रविचंद्रन अश्विनने 2, संदीप सिंग, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 बळी घेतला.
सुरुवातीला एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह त्याने फाफ डू प्लेसिसच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या सामन्यासाठी, दोन्ही संघांनी मागील सामन्यातील प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केला नाही. आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात संजू सॅमसन राजस्थानचे कर्णधारपद भूषवणार असून फाफ डू प्लेसिस आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पराभूत संघाचे आयपीएल 2024 चे चॅम्पियन होण्याचे स्वप्न या सामन्यात भंगणार आहे, तर विजयी संघ क्वालिफायर 2 मध्ये सनराजर्स हैदराबादशी सामना करताना दिसणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यातील हा सामना खूपच रंजक असणार आहे.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी - आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि टॉम कोहलर कॅडमोर यांनी राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात केली. आरसीबीसाठी स्वप्नील सिंगने पहिले षटक टाकले.
विराट कोहली बाद - राजस्थानने विराट कोहलीच्या (33) रूपाने आरसीबीला दुसरा धक्का दिला आहे. त्याने 8व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर युझवेंद्र चहलला टॉम कोहलर-कॅडमोरकरवी झेलबाद केलं. 7.2 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 56/2 झाली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 6 षटकांत 1 गडी गमावून 50 धावा केल्या. संघाला पहिला धक्का फाफ डू प्लेसिस 17 च्या रूपाने बसला. त्यानंतर विराट कोहली 33 धावा काढून बाद झाला. पहिला पॉवर प्ले राजस्थानच्या नावावर होता, ज्यामध्ये 1 मोठी विकेट देखील मिळाली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजीला सुरुवात केलीय. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाची सुरुवात केली आहे. राजस्थानसाठी ट्रेंट बोल्टने पहिलं षटक टाकलं आणि त्याने या षटकात एकूण 2 धावा दिल्या.