जेद्दाह Liam Livingstone in RCB : 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) संघ आयपीएलमध्ये खेळत आहे, परंतु संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. या संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलसारखे स्टार खेळाडू आहेत. आता लिलावात आरसीबी संघानं विजेतेपदासाठी मोठा डाव खेळला आहे. संघानं 8.75 कोटी रुपये भरुन 31 वर्षीय लियाम लिव्हिंगस्टोनला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. लिव्हिंगस्टोन T20 क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो कोणत्याही गोलंदाजीतही मदत करु शकतो.
आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो : लियाम लिव्हिंगस्टोननं यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जकडून क्रिकेट खेळलं आहे. त्यानं आतापर्यंत 39 आयपीएल सामन्यांमध्ये 939 धावा केल्या आहेत, ज्यात 94 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 162 पेक्षा जास्त आहे. तो आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो, जी काही काळापूर्वी दिनेश कार्तिक करत होता. याशिवाय लिव्हिंगस्टोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो अर्धवेळ गोलंदाजीही करु शकतो. तसंच त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 11 विकेटही आहेत.