महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्मा की विरेंद्र सेहवाग...? कोण आहे अधिक आक्रमक सलामीवीर, आकडेवारी पाहा अन् तुम्हीच ठरवा - Virender Sehwag vs Rohit Sharma

Virender Sehwag vs Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी वीरेंद्र सेहवाग हे आपापल्या काळातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. आज आम्ही या दोघांच्या आकडेवारीची तुलना करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की कोण कोणापेक्षा आक्रमक आहे.

Virender Sehwag vs Rohit Sharma
रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग (ETV Bharat)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 7, 2024, 10:28 AM IST

नवी दिल्ली Virender Sehwag vs Rohit Sharma : भारतीय क्रिकेट इतिहासात एक काळ असा होता की संघात सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आक्रमक फलंदाजीची भूमिका बजावत होता. शोएब अख्तरपासून डेल स्टेनपर्यंत, मुथय्या मुरलीधरनपासून दानिश कनेरियापर्यंत सर्व गोलंदाज सेहवागला घाबरत होते. सेहवाग मैदानात इच्छेनुसार फटके मारायचा. त्याच्या आक्रमक शैलीनं त्याला आघाडीवर ठेवलं, ज्यामुळं त्यानं त्याच्या काळात क्रिकेटच्या जगावर राज्य केलं आणि अनेक उत्कृष्ट विक्रमही आपल्या नावावर केले.

विरेंद्र सेहवाग (ANI Photo)

रोहितच्या नावे अनेक विक्रम : आता आधुनिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा आपल्या फलंदाजीनं गोलंदाजांना हादरवून सोडतो. रोहितनं मिचेल स्टार्क, टिम साऊथी आणि जेम्स अँडरसन यांसारख्या गोलंदाजांचा सळो की पळो करुन सोडलं आहे. हिटमॅन समोर अजंता मेंडिस आणि रशीद खान सारखे सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज देखील रोहितला गोलंदाजी करण्याला घाबरतात. मुंबईच्या या स्फोटक फलंदाजानं आपल्या काळात आपल्या आक्रमक खेळानं क्रिकेटच्या विश्वात बरीच मजल मारली आहे. आज आम्ही या दोघांच्या रेकॉर्डचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की कोण कोणापेक्षा आक्रमक आहे.

रोहित शर्मा (ANI Photo)

वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांची आकडेवारी कशी :

  • सेहवागनं भारतासाठी 400 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 16 हजार 119 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 41.54 आणि स्ट्राईक रेट 93 आहे. यात, त्यानं 36 शतकं आणि 67 अर्धशतकं केली आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 319 आहे. तसंच सेहवागनं 2245 चौकार आणि 227 षटकारही मारले आहेत.
  • तर रोहितनं भारतीय संघासाठी आतापर्यंत 354 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 15 हजार 138 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 46.57 आहे आणि स्ट्राईक रेट 93.46 आहे. यात, त्यानं 43 शतकं आणि 78 अर्धशतकं केली आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 आहे. रोहितनं 1522 चौकार आणि 539 षटकार मारले आहेत.

या आकडेवारीवर नजर टाकल्यास वीरेंद्र सेहवागच्या तुलनेत रोहित शर्मा अनेक बाबतीत पुढं आहे. रोहितकडं अजून 3 ते 4 वर्ष बाकी आहेत. यात, त्याला त्याच्या आकडेवारीत आणखी सुधारणा करण्याची आणि भारताचा सर्वात आक्रमक फलंदाज बनण्याची संधी असेल.

हेही वाचा :

  1. कार, बस, रेल्वेनं नव्हे तर स्वतःच्या 'प्रायव्हेट जेट'नं प्रवास करतात देशातील 'हे' दिग्गज क्रिकेटपटू - Indian Cricketers Private Jet
  2. राहुल द्रविडचं IPL मध्ये पुनरागमन... जुन्या संघाला बनवणार चॅम्पियन - IPL 2025

ABOUT THE AUTHOR

...view details