महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऋषभ पंत होता नॉट आउट? सामन्यानंतर रोहितचं मोठं विधान, एबी डिव्हिलियर्सनंही व्यक्त केला संशय

भारताला न्यूझीलंडविरुद्धचा तिसऱ्या कसोटी सामन्यात 25 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात ऋषभ पंत चांगलाच फॉर्ममध्ये दिसत होता, पण त्याची विकेट खूपच वादग्रस्त ठरली आहे.

Rishabh Pant
ऋषभ पंत (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 3, 2024, 4:12 PM IST

मुंबई Rishabh Pant Controversial Wicket : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला अवघ्या 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत अत्यंत खराब कामगिरी केली आणि मालिका 3-0 नं गमावली. न्यूझीलंडनं या मालिकेत भारताला क्लीन स्वीप दिला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी फक्त 147 धावांचं लक्ष्य होतं, पण भारतीय संघ 121 धावांवर ऑलआऊट झाला. मात्र, या सामन्यात एक असा क्षण आला जेव्हा भारतीय संघ हा सामना जिंकेल असं वाटत होतं. पंतनं ही आशा निर्माण केली होती, पण तसं झालं नाही आणि पंत अतिशय वादग्रस्त पद्धतीनं बाद झाला.

ऋषभ पंत नाबाद होता का? : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात धावांचा पाठलाग करताना ऋषभ पंतनं 57 चेंडूत 64 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं 9 चौकार आणि 1 षटकार मारला. पंत जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा असं वाटत होतं की तो भारतीय संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल. या सामन्यात त्याला एजाज पटेलनं बाद केले. वास्तविक, पंतला एजाज पटेलच्या चेंडूचा बचाव करायचा होता आणि तो पुढं सरकला. जिथं चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि तो चेंडू यष्टीरक्षक टॉम ब्लंडेलनं झेलला. या चेंडूनंतर न्यूझीलंड संघानं जोरदार अपील केलं, परंतु पंचांनी पंतला नाबाद दिलं. यानंतर किवी कर्णधार टॉम लॅथमनं रिव्ह्यू घेतला. त्यात चेंडू पॅडला लागला की बॅटला हे स्पष्ट होत नव्हतं. तिसऱ्या अंपायरनं हा चेंडू बराच वेळ तपासला आणि शेवटी तेही योग्य निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाही, पण त्यांनी मैदानावरील पंचांना पंतला आऊट देण्यास सांगितलं. यानंतर पंचाच्या या निर्णयानं पंतसह सर्व भारतीय चाहते आश्चर्यचकित झाले. रोहित शर्मानंही पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर चर्चा केली आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं ऋषभ पंतच्या वादग्रस्त बाद होण्याबाबत सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, आम्ही काही बोललो तर ते नीट घेतलं जाणार नाही, पण स्पष्ट निर्णय न झाल्यास मैदानावर घेतलेला निर्णय कायम ठेवला पाहिजे. तो निर्णय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. रोहित शर्माच्या वक्तव्यावरुन तो अंपायरच्या निर्णयावर खूश नसल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनंही ऋषभ पंतबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं लिहिलं की जेव्हा चेंडू बॅट आणि पॅडजवळून जातो तेव्हा स्निको आवाज पकडतो. अशा स्थितीत हॉटस्पॉट असावं.

हेही वाचा :

  1. न्यूझीलंडविरुद्ध मानहानिकारक पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये भारताचं मोठं नुकसान; अव्वल स्थानावरुन घसरण
  2. 'मुंबई'कर एजाज पटेलसमोर 'रोहित'सेनेची शरणागती; 92 वर्षाच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा दिवस

ABOUT THE AUTHOR

...view details