ETV Bharat / health-and-lifestyle

महिलांसाठी 'हे' घटक आहेत सुपरफूड; आजच करा आहारात समावेश

धावपडीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. परंतु त्यांनी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर त्या निरोगी राहू शकतात.

Superfood For Women For Health
सुपरफूड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : 10 hours ago

Superfood For Women For Health: प्रत्येक महिलेच्या दिवसाची सुरुवात धावपळीनं होते. उठायला उशीर झाला तर दिवसभराचा संपूर्ण वेळापत्रक बिघडतो. कारण महिलांना एक नव्हे अनेक काम स्वतः करावी लागतात. सकाळी नाश्त्यापासून ते नवरा आणि मुलांची तयारी करण्यापर्यंतचे काम महिला करते. त्यातही अनेक महिलांना घरकामकरून ऑफिसगाठायंच असते. अशा महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देवू शकत नाही. परिणामी महिलांना अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. निरोगी राहण्यासाठी महिलांना विश्रांतीबरोबरच सकस आहाराची गरज असते. यामुळे महिलांनी आपल्या आहारात काही सुपरफूडचा समावेश केल्यास त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकते.

  • हिरव्या भाज्या: हिरव्या भाज्यांमध्ये प्रथिनं लोह तसंच व्हिटॅमिन पुरेशा प्रमाणात आढळतात. महिलांनी आहारात पालक घ्यावं कारण पालकामध्ये मॅग्नेशियम, प्रथिने, लोह, खनिजे, तसंच कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात.
  • दूध: महिलांमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता असते. नियमित दूध प्यायल्यास शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढता येवू शकते. तसंच ऑस्टिओपोरोसिस सारखा धोका कमी करण्यासाठी देखील दूध फायदेशीर आहे.
  • आवळा: आवळ्यामध्ये व्हिटॅमिन डीची मात्रा पुरेशा प्रमाणात आहे. आवळ्याच्या नियमित सेवनानं रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसंच आवळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, व्हिटॅमिन ए आणि बी, प्रोटीन, मॅग्नेशियम, आदी पोषक घटक आढळतात. तसंच आवळा केसांसाठी आणि पोटासाठी चांगला आहे.
  • एवोकॅडो: एवोकॅडो हे अतिशय पौष्टिक फळ आहे. यात हेल्दी फॅट, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे पुरेशा प्रमाणात असते. महिलांसाठी एवोकॅडो खाणं अत्यंत उत्तम आहे. तसंच यात फॉलिक ॲसिड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जळजळ कमी होते. तसंच एवोकॅडोमुळे मधुमेह, हृदविकार, कर्करोग तसंच मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी होतो.
  • दही: महिलांनी आपल्या आहारात दह्याचा समावेश करावा. दही खाल्ल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होवू शकतो. तसंच पोटासंबंधित समस्यावर दही उत्तम आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मेणासारखं वितळेल बॅड कोलेस्ट्रॉल
  2. आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मेणासारखं वितळेल बॅड कोलेस्ट्रॉल
  3. 'या' व्यक्तींसाठी नाचणी आहे घातक? ..तर, तुमच्या आहारातून आजच टाळा
  4. हृदयापासून ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान आहे एबीसी ज्यूस; आजच करा आहारात समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.