दुबई Highest Paid Cricketer in IPL : आयपीएल 2025 पूर्वी, सौदी अरेबियातील जेद्दाह इथं एक मेगा लिलाव झाला. यात सर्व फ्रँचायझींनी भरपूर पैसा खर्च केला. लिलावात पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जायंट्सनं त्याच्यावर 27 कोटी रुपये खर्च केले. अशा परिस्थितीत आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 खेळाडू कोण आहेत?
पंत ठरला सर्वात महागडा, अय्यरही झाला मालामाल : या लिलावात सर्वांच्या नजरा ऋषभ पंतवर खिळल्या होत्या. पंतला लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघानं सोडलं होतं. त्याच्यावर मोठी बोली लावली जाणार हे निश्चित होतं आणि नेमकं तेच झालं. लखनऊ सुपर जायंट्स संघानं पंतला तब्बल 27 कोटी रुपयांत खरेदी केलं. 2016 नंतर पंत पहिल्यांदाच दिल्लीशिवाय अन्य संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंत अलीकडं उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी कार अपघातानंतर परतल्यानंतर त्यानं खूप धावा केल्या. लखनऊचा संघ त्याला कर्णधार बनवू शकतो. तसंच श्रेयस अय्यरलाही तब्बल 26.75 करोड रुपयांमध्ये पंजाब किंग्जनं आपल्याकडं घेतलं आहे.
#TATAIPLAuction ✅
— IndianPremierLeague (@IPL) November 26, 2024
Here are the Top 🔟 Buys after the 2⃣-day Auction Extravaganza 🔽#TATAIPL pic.twitter.com/rOBAtJE0iZ
पंतची आयपीएल कारकिर्द कशी : पंतनं 2016 पासून त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत दिल्ली कॅपिटल्सचं (डीसी) प्रतिनिधित्व केलं आहे. या काळात त्यानं दिल्लीसाठी 110 सामन्यांमध्ये 35.31 च्या सरासरीनं एक शतक आणि 18 अर्धशतकांसह 3,284 धावा केल्या आहेत. त्याला 2021 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्याच हंगामात त्यानं आपल्या संघाला प्लेऑफमध्ये नेलं होतं.
- IPL 2025 मध्ये कोहलीला 21 कोटी मिळाले.
- विराट कोहली आयपीएल 2025 मधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनला आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं त्याला 21 कोटी रुपये देऊन रिटेन केलं.
- चेन्नई सुपर किंग्सनं महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून सामील केलं.
- आयपीएलच्या नवीन नियमांनुसार धोनी 5 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही.
- अशा परिस्थितीत सीएसकेनं धोनीवर 4 कोटी रुपये खर्च केले.
- मुंबई इंडियन्सनं माजी कर्णधार रोहित शर्माला 16.30 कोटींमध्ये आपल्या संघात जोडलं.
The 🔝 FIVE buys of #TATAIPLAuction 2025 were the Indian stars 😎✨
— IndianPremierLeague (@IPL) November 26, 2024
Which player do you reckon will make the biggest impact in #TATAIPL 2025? 🤔 pic.twitter.com/FpekDZrkrX
IPL मध्ये रोहित शर्माची सर्वाधिक कमाई : रोहित शर्मा आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. तो 2008 पासून या लीगचा भाग आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून त्यानं आतापर्यंत 210.9 कोटी रुपये कमावले आहेत. रोहित पहिल्या 3 मोसमात डेक्कन चार्जर्सचा भाग होता. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्समध्ये आहे. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या सत्रापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग असलेल्या विराटनं आयपीएलमधून आतापर्यंत 209.2 कोटी रुपये कमावले आहेत.
आयपीएलमधून सर्वाधिक कमाई कराणारे खेळाडू :
- रोहित शर्मा : 210.9 कोटी
- विराट कोहली : 209.2 कोटी
- एमएस धोनी : 192.84 कोटी
- रवींद्र जडेजा : 143.01 कोटी
- सुनील नरिन : 125.15 कोटी
पहिल्या सत्रात धोनी ठरला होता सर्वात महागडा :
- या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- धोनीनं आयपीएलमधून आतापर्यंत 192.84 कोटी रुपये कमावले आहेत.
- पहिल्या सत्रात धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
- अष्टपैलू रवींद्र जडेजा या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
- IPL मधून जड्डूनं आतापर्यंत 143.01 कोटी रुपये कमावले आहेत.
- सुनील नरेन पाचव्या क्रमांकावर आहे.
- वेस्ट इंडिजच्या नरीनला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमधून 125.15 कोटी रुपये मिळाले आहेत.
𝗠𝗼𝘀𝘁 𝗘𝘅𝗽𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗣𝗹𝗮𝘆𝗲𝗿 𝗜𝗻 𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 🤯
— IndianPremierLeague (@IPL) December 3, 2024
Rishabh Pant broke the record as Lucknow Super Giants successfully bid ₹27 crore for the Indian player during the recently concluded #TATAIPLAuction 💪#TATAIPL | @RishabhPant17 | @LucknowIPL pic.twitter.com/IoOQWWxxdt
IPL मधून विराट कोहलीची कमाई किती :
- IPL 2008 ते 2010 : 12 लाख
- IPL 2011 ते 2013 : 8.28 कोटी
- IPL 2014 ते 2017 : 12.5 कोटी
- IPL 2018 ते 2021 : 17 कोटी
- IPL 2022 ते 2024 : 15 कोटी
- IPL 2025 : 21 कोटी
रोहित शर्माची IPL मधून कमाई :
- IPL 2008 ते 2010 : 3 कोटी
- IPL 2011 ते 2013 : 9.2 कोटी
- IPL 2014 ते 2017 : 12.5 कोटी
- IPL 2018 ते 2020 : 15 कोटी
- IPL 2021 ते 2024 : 16 कोटी
- IPL 2025: 16.30 कोटी
एमएस धोनीची IPL मधून कमाई :
- IPL 2008 ते 2010 : 6 कोटी
- IPL 2011 ते 2013 : 8.28 कोटी
- IPL 2014 ते 2017 : 12.5 कोटी
- IPL 2018 ते 2021 : 15 कोटी
- IPL 2022 ते 2024 : 12 कोटी
- IPL 2025 : 4 कोटी
हेही वाचा :