बेंगळुरु Rishabh Pant Out on 99 : भारतीय क्रिकेट संघानं बंगळुरु इथं सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावात 356 धावांनी पिछाडीवर असतानाही भारतीय संघानं सामन्यात न्यूझीलंडवर वर्चस्व राखलं आहे. मात्र दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. सरफराज खानच्या दीडशतकानंतर ऋषभ पंतनंही अप्रतिम खेळी केली. मात्र तो शतकापासून फक्त 1 धाव दूर राहिला. 99 धावा केल्यानंतर त्यानं आपली विकेट गमावली. पण बाद होण्यापूर्वी त्यानं भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणलं.
ऋषभ पंतचं शतक 1 धावेनं हुकलं : ऋषभ पंत एकेकाळी कठीण परिस्थितीत भारतीय संघाचा संकटमोचक बनला होता. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात त्यानं 105 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं 9 चौकार आणि 5 षटकार मारले. ही सातवी वेळ होती जेव्हा पंत 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्यानंतर शतक करु शकला नाही. याआधी ऋषभ पंत कसोटीत 97 धावा, 96 धावा, 93 धावा, 92 धावा, 92 धावा आणि 91 धावा करुन बाद झाला आहे.