बेंगळुरूRCB vs KKR live score : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2024 चा 10 वा सामना शुक्रवारी बेंगळुरूमध्ये खेळला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. बेंगळुरूसाठी विराट कोहलीनं सर्वाधिक 83 धावा केल्या. प्रत्युत्तरात फिल सॉल्ट, सुनील नरेन यांनी कोलकाता नाईट रायडर्सला धमाकेदार सुरुवात करून दिली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. कर्णधार फाफ डुप्लेसिस 6 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. कॅमेरून ग्रीननं 21 चेंडूत जलद 33 धावा केल्या. स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं 19 चेंडूत 28 धावांची खेळी खेळली. रजत पाटीदारला कोलकात्याविरुद्ध फक्त तीन धावा करता आल्या. अनुज रावतनं केवळ तीन धावा केल्या. 8 चेंडूत 20 धावा केल्यानंतर दिनेश कार्तिक शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. विराट कोहलीनं 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. आपल्या खेळीत त्यानं चार चौकार तसंच चार षटकार मारले. कोलकाताकडून आंद्रे रसेल, हर्षित राणा यांनी 2-2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्स संघानं दमदार सुरुवातीचा फायदा घेत 16.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा करत सामना जिंकला. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी कोलकाता नाईट रायडर्सला चांगली सुरुवात करून दिली आहे. सुनील नरेन 22 चेंडूत 47 धावा करून बाद झाला तर फिलिप सॉल्ट 20 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. व्यंकटेश अय्यर 30 चेंडूत 50 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 39 धावा केल्या. रिंकू 5 धावा करून नाबाद राहिला.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
IPL सामन्यांचं वेळापत्रक :
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनौ, संध्याकाळी 7.30 वा.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 PM