महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टेनिसमधील एका युगाचा अंत... 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालची निवृत्ती - RAFAEL NADAL

22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालनं टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यानं निवृत्तीची घोषणा केली.

Rafael Nada
राफेल नदाल (AFP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 10, 2024, 3:34 PM IST

Updated : Oct 10, 2024, 3:59 PM IST

मुंबई Rafael Nadal Announced Retirement : टेनिसमधील आणखी एक युग संपुष्टात आले आहे. गुरुवारी (10 ऑक्टोबर) चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालनं टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा हंगाम त्याचा शेवटचा असणार आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.

जोकोविचच्या नावावर सर्वाधिक ग्रँडस्लॅम : अवघ्या 4 वर्षांपूर्वी महान स्विस टेनिसपटू रॉजर फेडररनं निवृत्ती घेतली होती. आता नदालनंही या खेळाला अलविदा केला आहे. फेडररनं 20 ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावली होती. या यादीत नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत, सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं आतापर्यंत सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. 38 वर्षीय नदालनं एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे. याद्वारे त्यानं निवृत्तीची घोषणा केली.

सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू :

  • 24 - नोव्हाक जोकोविच (सर्बिया)
  • 22 - राफेल नदाल (स्पेन)
  • 20 - रॉजर फेडरर (स्विझर्लंड)
  • 14 - पीट सॅम्प्रास (अमेरिका)
  • 12 - रॉय इमर्सन (ऑस्ट्रलिया)

काय म्हणाला नदाल : या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या डेव्हिस कपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याचे नदालनं सांगितलं. या स्पर्धेत तो आपल्या देश स्पेनचं प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी स्पेनमधील मालागा इथं डेव्हिस कपची फायनल होणार आहे. नदाल म्हणाला, "माझी शेवटची स्पर्धा डेव्हिस चषक फायनल असेल, ज्यात मी देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे, यासाठी मी खूप उत्साहित आहे. माझा विश्वास आहे की व्यावसायिक टेनिसपटू म्हणून माझ्या पहिल्या विजयाच्या आनंदानंतर मी आता पूर्ण वर्तुळाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहे. डेव्हिस कप फायनल 2004 मध्ये झाली. मी स्वतःला सुपर सुपर लकी समजतो की मी खूप काही अनुभवलं आहे."

हेही वाचा :

  1. 823/7... इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उभारला धावांचा हिमालय; क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात 'असं' फक्त चारवेळा झालं
  2. सचिन तेंडुलकर पुन्हा दिसणार भारतीय जर्सीत... कोणत्या लीगमध्ये करणार भारताचं नेतृत्व? वाचा A टू Z माहिती
  3. एका संघात सहा खेळाडू, 5-5 षटकांचे सामने, कोणतं आहे हे अनोखं टूर्नामेंट? ज्यात भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने
Last Updated : Oct 10, 2024, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details