पॅरिस Paris Olynmpics 2024 Badminton : भारतीय संघाची स्टार शटलर पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपली विजयी मोहीम कायम ठेवली. तिनं ग्रुप M च्या तिच्या तिसऱ्या सामन्यात 73व्या मानांकित इस्टोनीयाच्या क्रिस्टन कुबाविरुद्ध 21-9 आणि 21-10 अशा दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला आहे. यासह ती आता राऊंड ऑफ 16 (उपउपांत्यपूर्व फेरी) साठी पात्र झालीय. तिच्याकडून या ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा आहे.
पहिल्या सेटमध्ये सहज विजय : पीव्ही सिंधूनं सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखलं आणि पहिला सेट 21-5 असा सहज जिंकला. सिंधूचे बॅकहँड शॉट्स परत करण्यासाठी तिच्या प्रतिस्पर्ध्यानं संघर्ष केला आणि सिंधूनं दुसरा सेट 21-10 असा सरळ सेटमध्ये जिंकला. सिंधूनं कुबाविरुद्धच्या सामन्यात दमदार सुरुवात केली आणि पहिले तीन गुण जिंकत आघाडी घेतली. तिनं आपली आघाडी कायम ठेवली. अशाप्रकारे 29 वर्षीय सिंधूनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याआधी तिनं M गटातील मागच्या सामन्यात मालदीवच्या फातिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा पराभव केला होता.
उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश : सर्व 16 गटातील अव्वल खेळाडूंनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत 73व्या क्रमांकावर असलेल्या इस्टोनियन खेळाडूला 13व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय खेळाडूचा सामना करता आला नाही. सिंधूनं पहिला सेट 14 मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कुबानं काहीप्रमाणात आव्हान दिलं. मात्र सिंधूनं तिच्या प्रत्येक आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिले. कुबानं दुसऱ्या सेटमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली. परंतु, सिंधूनं लवकरच बरोबरी साधली आणि एका क्षणी, सिंधूला संपूर्ण नेट झाकून धावावं लागलं कारण कुबानं शटल तिच्या आवाक्याबाहेर फेकली. यानंतर सिंधूनं तिच्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत क्रॉसकोर्ट स्मॅशसह 15-6 अशी आघाडी घेतली आणि यानंतर कुबाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
पहिल्या सामन्यात मिळवला होता सहज विजय : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरा विजय मिळवला. सिंधूनं 28 जुलै रोजी महिला एकेरीच्या गट M मधील पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा सहज पराभव केला होता. सिंधूनं हा सामना जागतिक क्रमवारीत 111व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूविरुद्ध 21-9, 21-6 असा सहज जिंकला होता. त्यावेळी हा सामना केवळ 29 मिनिटं चालला होता.
हेही वाचा :
- पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी झालेले 'हे' दोन खेळाडू मध्य रेल्वेत करतात सेवा - PARIS OLYMPICS 2024 NEWS
- पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्याच दिवशी भारताला धक्का; 'या' दिग्गजांचं आव्हान संपुष्टात - Paris Olynmpics 2024