पॅरिस Paris Olympics 2024 : तुर्कीचा एअर पिस्तूल नेमबाज युसूफ डिकेकनं बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. तथापि, सोशल मीडियावर त्याची छायाचित्रं आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं डिकेक चर्चेचा विषय ठरला. कारण त्यानं या स्पर्धेत निशाणा लावताना अधिक अचूकतेसाठी डोळ्यांच्या आणि कानाच्या संरक्षणासाठी इतर नेमबाजांनी घातलेले बरंच साहित्य घातलेलं नव्हतं.
कोणतंही साहित्य न वापरता जिंकलं पदक :नेमबाजीत निशाणा साधताना नेमबाद बरेच उपकरणं परिधान करतात. ज्यात चांगल्या अचूकतेसाठी आणि डोळे अंधुक होऊ नये यासाठी विशेष चष्मा आणि आवाज कमी करण्यासाठी कान-संरक्षकांचा समावेश आहे. मात्र डिकेकनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणतंही गॅझेट न घालता भाग घेत देशासाठी रौप्य पदक जिंकून आपली चमक दाखवली. त्याच्या या खेळीनं शूटिंग चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. 51 वर्षीय डिकेकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. डिकेक आणि त्याची सहकारी सेवल इलायदा तरहान यांनी 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं.
अनेक खेळांमध्ये घेतला भाग :या तुर्की नेमबाजानं त्याचा नियमित प्रिस्क्रिप्शन चष्मा आणि इअरप्लग घातले होते, तरीही बहुतेक प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. त्यानं एका हात खिशात ठेवत एका हातानं निशाणा साधला आणि त्याचे शॉट्स शानदारपणे लावले. त्याच्या पन्नास ऑलिम्पिक खेळांमध्ये, डिकेकनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वयक्तिक स्पर्धेतही भाग घेतला होता. परंतु, त्यात तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकला नाही आणि 13 व्या स्थानावर राहिला. पिस्तुलसह उत्कृष्ट कारकीर्दीनंतर, त्यानं अत्यंत सहज शैलीत आपलं पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकण्यात यश मिळविलं. नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्बियन नेमबाज झोराना अरुनोविक आणि दामिर मिकेक यांनी शानदार पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. सर्बियन जोडी मिकेकनं 6 गुणांची तूट भरुन काढत तुर्कीच्या जोडीचा 16-14 असा पराभव करुन विजेतेपदाचा सामना गाठला.
हेही वाचा :
- अभिनव बिंद्राला पाहण्यासाठी सोडली होती बारावीची परिक्षा, महाराष्ट्राच्या 'धोनी'नं कसं जिंकलं पॅरिस? - Paris Olympics 2024
- पॅरिसमध्ये मराठी डंका... कोल्हापूरच्या सुपुत्रानं अचूक 'नेम' लावत रचला इतिहास, भारताला मिळालं तिसरं पदक - Paris Olympics 2024