नवी दिल्ली Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 11 व्या दिवशी भारताचा दिवस चांगला होता. मंगळवारी भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर विनेश फोगाटने महिलांच्या 50 किलो गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता 12व्या दिवशी भारताच्या साऱ्या नजरा वेटलिफ्टर मीराबाई चानू, अविनाश साबळे आणि महिला टेबल टेनिस संघावर असणार आहेत.
7 ऑगस्ट रोजी भारतीय खेळाडूंचे होणारे सामने
गोल्फ - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आपल्या 12व्या दिवसाची सुरुवात गोल्फने करणार आहे. गोल्फमध्ये अदिती अशोक आणि दीक्षा डागर महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले फेरी-1 स्पर्धेत दिसणार आहेत. या दोन महिला गोल्फपटूंकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
- महिला एकेरी फेरी-1(अदिती अशोक आणि दीक्षा डागर) - दुपारी 12.30 वाजता
टेबल टेनिस - महिलांच्या टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पाहायला मिळणार आहे. अर्चना कामथ, मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला भारतीय संघात आपली सर्वोत्तम कामगिरी करताना दिसतील. भारतीय संघाने राऊंड ऑफ 16 मध्ये रोमानियन संघाचा पराभव केला होता.
- महिला संघ उपांत्यपूर्व फेरी (अर्चना कामथ, मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला) - दुपारी 1:30 वाजता
ॲथलेटिक्स - ऑलिम्पिकच्या 12व्या दिवशी भारताचे सूरज पवार आणि प्रियांका गोस्वामी मॅरेथॉन शर्यतीच्या वॉक रिले मिश्रित भाग घेताना दिसतील. याशिवाय, भारताची ज्योती याराजी महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीच्या पहिल्या फेरीत सहभागी होणार आहे. प्रवीण चित्रवेल आणि अब्दुल्ला नारंगोलिंतेविदा पुरुषांच्या तिहेरी उडी पात्रतेमध्ये सहभागी होतील. याशिवाय सर्वेश अनिल कुशारे दिसणार आहे. तो पुरुषांच्या उंच उडी पात्रता स्पर्धेत दिसणार आहे. यासह अविनाश मुकुंद साबळे पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिसणार आहे. भारताला त्याच्याकडून पदकाच्या आशा असतील.
- मॅरेथॉन शर्यत वॉक रिले मिश्र स्पर्धा (सूरज पवार आणि प्रियंका गोस्वामी) - सकाळी 11:00 वाजता
- महिलांची 100 मीटर अडथळा फेरी 1 (ज्योती याराजी) - दुपारी 1:45 वाजता
- पुरुषांची तिहेरी उडी पात्रता (प्रवीण चित्रवेल आणि अब्दुल्ला नारंगोलिंतेविडा) - रात्री 10:45 वाजता
- पुरुषांची उंच उडी पात्रता (सर्वेश अनिल कुशारे) - दुपारी 1:35 वाजता
- पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस फायनल (अविनाश साबळे) - दुपारी 1:10 वाजता
कुस्ती - भारतासाठी कुस्तीमध्ये महिलांच्या 53 किलो गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये अंतिम पंघाल तुर्कीच्या झेनेप येटगिलसोबत खेळताना दिसणार आहे. हे सामने प्री-क्वार्टर फायनलपासून सेमीफायनलपर्यंत रंगणार आहेत.
- महिला फ्रीस्टाइल 53 किलो प्री-क्वार्टर फायनल (अंतिम पंघाल) - दुपारी 2:30 वाजता
वेटलिफ्टिंग - टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानू भारतासाठी 12व्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये दिसणार आहे. चानूकडून पुन्हा एकदा देशासाठी पदक निश्चित करण्याची भारताची अपेक्षा असेल. मीराबाई चानू महिलांच्या 49 किलो गटात दिसणार आहे. हा सामना पदकांचा सामना असणार आहे. त्याची अलीकडची कामगिरी चांगलीच झाली आहे. या
- महिलांची 49 किलो स्पर्धा (मीराबाई चानू)- रात्री 11 वाजता
हेही वाचा
- विनेश फोगाटची उपांत्य फेरीत धडक, भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या!! - Paris Olympics 2024
- गोल्डन बॉय नीरज चोप्राचा 'बाहुबली थ्रो', पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक - Paris Olympics 2024
- उपांत्य फेरीत भारत-जर्मनी यांच्यात कांटे की टक्कर, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी - Paris Olympics 2024