नवी दिल्ली 28 July India Olympic Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा पहिला दिवस भारतासाठी संमिश्र होता. आज म्हणजेच 28 जुलै (रविवार) भारतीय खेळाडूंना दुसऱ्या दिवशी पुन्हा आपली प्रतिभा दाखवायची आहे. आज, भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, टेबल टेनिस आणि तिरंदाजी या खेळांमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करताना दिसतील.
28 जुलै रोजी भारतीय खेळाडूंचे सामने :
रोइंग - बलराज पनवार भारतासाठी रोइंग स्पर्धेत दिसणार आहे. रोइंगमध्ये चौथं स्थान मिळवून त्यानं रिपेचेजमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. बलराजनं 7:07.11 मिनिटं वेळ घेत चौथा क्रमांक पटकावला. आता तो कांस्यपदकासाठी आपली दावेदारी करताना दिसणार आहे.
- पुरुष एकेरी स्कल्स रिपेचेज फेरी (बलराज पनवार - भारत) - दुपारी 12:30 वाजता
नेमबाजी - वालारिवान इलावेनिल आणि रमिता रमिता भारतासाठी 10 मीटर एअर रायफल शूटिंग महिला पात्रता सामन्यांमध्ये सहभागी होतील. यानंतर संदीप सिंग आणि अर्जुन बबुता पुरुषांच्या पात्रता 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत दिसणार आहेत. हे दोघांकडूनही भारताला पदकाची आशा आहे. यानंतर अंतिम सामने होतील. ज्यांची वेळ वेगळी आहे.
- 10 मीटर एअर रायफल (महिला पात्रता) - दुपारी 12:45 वाजता
- 10 मीटर एअर पिस्तूल (पुरुष पात्रता) - दुपारी 1 वाजता
- 10 मीटर एअर रायफल (पुरुष अंतिम) - दुपारी 02:45 वाजता
- 10 मीटर एअर पिस्तूल (महिला अंतिम) - दुपारी 3:30 वाजता
बॅडमिंटन - पॅरिस ऑलिम्पिकचा दुसरा दिवस भारतासाठी बॅडमिंटनमध्ये ॲक्शन पॅक्ड दिवस असणार आहे. महिला एकेरीत पीव्ही सिंधू जर्मनीच्या रोथ फॅबियनसोबत खेळताना दिसणार आहे. तर एचएस प्रणॉय पुरुष एकेरीत दिसणार आहे.
- महिला एकेरी - पीव्ही सिंधू : दुपारी 12 वाजता
- पुरुष एकेरी - एच.एस. प्रणॉय : रात्री 8.30 वाजता