पॅरिस Paris Olympics 2024 Table Tennis : भारताची टेबल टेनिस स्टार श्रीजा अकुलानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टेबल टेनिस महिलांच्या एकेरीत सिंगापूरच्या झेंग जियानवर 4-2 असा दणदणीत विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यासह अकुलानं आपल्याच खेळाडूच्या विक्रमी कामगिरीची बरोबरी केली आहे. टेबल टेनिसच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होची. आता श्रीजा अकुलानंही राऊंड ऑफ 16 म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करुन ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या प्री-कार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी भारताची दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे आज श्रीजाचा वाढदिवसही आहे.
कसा झाला सामना : या सामन्याचा पहिला सेट सिंगापुरच्या जियाननं जिंकला, त्यानंतर श्रीजानं दुसरा (12-10), तिसरा (11-4) आणि चौथा सेट (11-5) जिंकला. तर पाचव्या सेटमध्ये जियाननं पुन्हा पलटवार करत सेट 10-12 असा जिंकला. यानंतर अकुलानं जोरदार पुनरागमन करत सहावा सेट 12-10 असा जिंकून सामना 4-2 असा जिंकला. यासह, तिनं राऊंड ऑफ 32 मध्ये चमकदार कामगिरी करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.