पॅरिस Paris Olympics 2024 : भारताची दिग्गज नेमबाज मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिचा अंतिम सामना उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता होणार आहे. तिला एकूण 580 गुण मिळाले. तिच्या या शानदार कामगिरीमुळं देशाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळू शकतं.
अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीत :मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. आपल्या खेळात सातत्य राखत तिनं नेमबाजी करताना तिसरं स्थान पटकावण्यात यश मिळवलं. यामध्ये अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र होतात. मनूला अंतिम फेरीत स्थान मिळालं. मात्र, भारताची दुसरी नेमबाज रिदम सांगवानच्या पदरी निराशा पडली अन तिला 15व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
20 वर्षांनंतर वयक्तिक महिला नेमबाज अंतिम फेरीत :मागील 20 वर्षांमध्ये वयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी मनू भाकर पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. यापूर्वी भारताच्या सुमा शिरुरनं 2004 मध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मध्ये अथेन्स इथं झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
रिदम सांगवानच्या पदरी निराशा :महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रिदम सांगवान देखील सहभागी होती. परंतु, तिनं निराशा केली. रिदम 573 गुणांसह 15व्या स्थानावर राहिली. 22 वर्षीय मनू भाकर टोकियो ऑलिम्पिकमध्ये विशेष काही करु शकली नव्हती. ती 10 मीटर एअर पिस्तूल, 25 मीटर पिस्तूल आणि 10 मीटर पिस्तूल मिश्र संघ या तीन स्पर्धांमध्ये सहभागी आहे.
हेही वाचा :
- पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात हिंदी भाषेला मिळाला 'खास' सन्मान - Paris Olympics 2024
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी पदक जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं; 'या' भारतीय खेळाडूनं जिंकलं होतं पहिल्याच दिवशी पदक - Paris Olympics 2024
- शानदार सोहळ्यानं पॅरिस ऑलिम्पिकचं उद्घाटन; भारतीय पारंपरिक वेशभूषा अन्... 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष - Paris Olympics 2024