पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला आणखी एक पदकानं हुलकावणी दिली. कारण भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन बॅडमिंटन लक्ष्य सेन इतिहास रचण्यात चुकला : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन इतिहास रचण्यात चुकला. सेननं आज पदक जिंकलं असतं तर बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो भारतासाठी पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला असता. 22 वर्षीय लक्ष्य सेनचं हे पहिलेच ऑलिम्पिक आहे आणि त्यानं आपल्या पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठून दमदार कामगिरी केली आहे.
पहिल्या सेटमध्ये चमकदार कामगिरी : भारताचा युवा स्टार लक्ष्य सेन सुरुवातीपासूनच त्याच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा वरचढ दिसत होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच लक्ष्यनं आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत मध्यांतरापर्यंत 11-7 अशी आघाडी घेतली. सेनच्या आक्रमाणाला ली जी जियाकडे उत्तर नव्हतं. सेननं आपला शानदार खेळ सुरु ठेवत पहिला सेट 21-13 असा सहज जिंकला.
दुसरा सेट रोमांचक :दोन्ही खेळाडूंमधील दुसरा सेट खूपच रोमांचक झाला. सेननं या सेटची सुरुवात उत्तम शैलीत केली. पण उपांत्य फेरीप्रमाणेच तो नंतर गारद झाला. लक्ष्याला सुरुवातीची आघाडी मिळाली पण मलेशियाच्या खेळाडूनं जोरदार पुनरागमन करत मध्यांतरापर्यंत 11-8 अशी आघाडी घेत 3 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर सेननं पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण मलेशियाच्या खेळाडूनं त्याला फारशी संधी दिली नाही आणि दुसरा सेट 21-16 असा जिंकला.