पॅरिस Paris Olympics 2024 Boxing : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला गुरुवारी मोठा धक्का बसला. भारताची स्टार बॉक्सर निखत जरीन उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाल्यानंतर ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या राऊंड ऑफ 16 च्या लढतीत भारतीय बॉक्सर निखत जरीनला चीनच्या वू यू हिच्याकडून 5-0 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवासह जरीनाची ऑलिम्पिकमधील मोहीम संपुष्टात आली.
निखत जरीनची ऑलिम्पिक मोहीम संपली : पॅरिसमध्ये निखत जरीन यांच्याकडून 140 कोटी देशवासीयांना विजयाची अपेक्षा होती. मात्र चीनच्या बॉक्सरकडून पराभूत झाल्यानं ती पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. चीनच्या वू यूनं आक्रमक सुरुवात केली आणि पहिल्या फेरीतच जरीनवर पूर्ण वर्चस्व राखलं. मात्र, दोन वेळची जगज्जेती भारताच्या निखत झरीननं दुसऱ्या फेरीत शानदार पुनरागमन केलं. मात्र चीनच्या बॉक्सरनं ही फेरी जिंकली.
विश्वविजेत्या चिनी बॉक्सरकडून पराभव : यानंतर तिसऱ्या फेरीत जरीन थकल्यासारखी दिसली आणि तिसरी फेरी एकतर्फी चिनी बॉक्सर वू यूकडे गेली. सध्याच्या 52 किलो वजनी गटातील विश्वविजेती आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती चीनच्या वू यूनं या विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. यासह तिचं पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवण्यापासून ती फक्त एक विजय दूर आहे.
जर्मनीच्या बॉक्सरचा केला होता पराभव : या पराभवापूर्वी, भारताच्या 28 वर्षीय जरीननं एरिना पॅरिस नॉर्ड इथं राउंड ऑफ 32 च्या सामन्यात सर्वानुमते निर्णय घेऊन जर्मनीच्या मॅक्सी कॅरिना क्लोत्झरचा पराभव करुन राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला होता. मात्र यात तिला पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा :
- एक हात खिशात टाकून 51 वर्षीय खेळाडूनं नेमबाजीत जिंकलं रौप्यपदक, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क - Paris Olympics 2024
- अभिनव बिंद्राला पाहण्यासाठी सोडली होती बारावीची परीक्षा, महाराष्ट्राच्या 'धोनी'नं कसं जिंकलं पॅरिस? - Paris Olympics 2024
- पॅरिसमध्ये मराठी डंका... कोल्हापूरच्या सुपुत्रानं अचूक 'नेम' लावत रचला इतिहास, भारताला मिळालं तिसरं पदक - Paris Olympics 2024