पॅरिस Paris Olympics 2024 Archery :भारतीय तिरंदाजदीपिका कुमारीनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र दीपिकाला पराभवाचा सामना करावा लागला. दीपिकाला कोरियाच्या नाम एस च्या विरोधात 6-4 नं पराभवाचा सामना करावा लागला.
दीपिकाची उपांत्यपूर्व फेरीत धडक :30 वर्षीय दीपिकानं उपउपांत्यपूर्व सामन्यात पहिला सेट 27-24 असा जिंकला, त्यामुळं तिच्या प्रतिस्पर्ध्याला पहिल्या प्रयत्नात केवळ सहा गुण मिळवता आले. दोन्ही तिरंदाजांनी 27 पॉइंट्स केल्यानं दुसरा सेट अनिर्णित राहिला. यानंतर दीपिकानं तिसरा सेट 26-25 असा जिंकला, मात्र क्रॉपेननं शानदार पुनरागमन करत चौथा सेट 29-27 असा जिंकला. मात्र, भारताच्या अनुभवी तिरंदाजानं स्वत:वर नियंत्रण ठेवलं आणि पाचव्या सेटमध्ये तिच्या जर्मन प्रतिस्पर्ध्याची 27 गुणांची बरोबरी करुन उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलं. आजच खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना कोरियन तिरंदाज नॅम एस हिच्याशी होणार आहे.