पॅरिस Paris Olympics 2024 Opening Ceremony :खेळाचा महाकुंभ अर्थात ऑलिम्पिकची आजपासून (26 जुलै) सुरुवात होत आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सीन नदीच्या काठावर होणार आहे. 'लाइट ऑफ सिटी' आणि त्यातून वाहणाऱ्या जलमार्गांचा गौरव करुन स्टेडियमबाहेर उद्घाटन सोहळा आयोजित करण्याची इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. अनेक प्रभावशाली राजकीय व्यक्ती आणि हजारो कलाकार पॅरिसमध्ये हा खेळ महोत्सव सुरु होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. या कार्यक्रमात अनुभवी पॅडलर अचंता शरथ कमल आणि शटलर पीव्ही सिंधू हे भारताचे ध्वजवाहक असतील.
ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात प्रथमच असा उद्घाटन समारंभ :
- स्टेडियमच्या बाहेर होणार उद्घाटन सोहळा
- अनेक प्रेक्षकांना प्रवेश घेऊन पाहता येणार सोहळा
- नदीवर होणार समारंभ
- खास प्रेक्षकंसाठी होणार सोहळा
- खेळाडूंसाठी त्यांच्यासाठी तयार केलेला समारंभ
- उद्घाटन सोहळ्यात काय खास :
ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभासाठी सीन नदीच्या बाजूनं सुमारे 94 नौका परेड ताफ्यात सहभागी होतील. परेडचा मार्ग 6 किलोमीटर लांबीचा आहे. ज्यात 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचे (एनओसी) प्रतिनिधित्व करणारे 10 हजार 500 खेळाडू असतील.
- उद्घाटन समारंभाची वेळ :
पॅरिस ऑलिम्पिक 2204 चा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार रात्री 11:00 वाजता सुरू होईल, हा सोहळा 3 तासांपेक्षा जास्त काळ चालेल अशी अपेक्षा आहे.
- उद्घाटन समारंभाचं ठिकाण :
उद्घाटन समारंभाची परेड जार्डिन डेस प्लांटेसजवळील ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरु होईल आणि सीन नदीच्या बाजूनं पूर्वेकडून पश्चिमेकडे जाईल. बोटीवरील ऍथलीट्सला कॉनकॉर्ड अर्बन पार्क, इनव्हॅलिड्स आणि ग्रँड पॅलेससह अनेक ऑलिम्पिक साइट्स पाहतील. आयफेल टॉवरला ट्रोकाडेरो जिल्ह्याला जोडणाऱ्या इना ब्रिज इथं या परेडचा समारोप होईल. याठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उद्घाटनाचं भाषण देतील.
- परेडचा मार्ग :