महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

"विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेटपटूंना 11 कोटी दिले, पण...", स्वप्नीलच्या वडिलांनी का व्यक्त केली खंत?

ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिक स्पर्धा होऊन 2 महिने 6 दिवस झाले तरीही सरकारनं जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 4 hours ago

SWAPNIL KUSALE FATHER
स्वप्नीलच्या वडीलांनी व्यक्त केली खंत (Source - ETV Bharat)

कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिक स्पर्धा होऊन 2 महिने 6 दिवस झाले, तरीही राज्य सरकारनं जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. खेळातील दर्जा आणि सातत्य कायम ठेवायचं असेल आणि आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवायचं असेल, तर स्वप्नीलला उच्च दर्जाच्या सरावाची गरज आहे. यासाठीच बक्षिसाच्या रकमेत वाढ करून ती 5 कोटी करावी, अशी मागणी स्वप्नील कुसाळेचे वडील सुरेश कुसाळे यांनी केलीय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नेमबाजांबाबत सरकार इतकं उदासीन आहे, असं माहीत असतं तर स्वप्नीलला नेमबाजीत पाठवलंच नसतं, अशा भावनाही स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केल्यात.

दोन महिन्यांनी बक्षीस जाहीर :ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलेला नेमबाज स्वप्नील कुसाळे याची राज्य सरकारनं चेष्टा केल्याची खंत स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे बोलून दाखवली. राज्य सरकारनं जाहीर केलेलं बक्षीस अतिशय तोकडं आहे. ते बक्षीसदेखील ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर दोन महिन्यांनी जाहीर करण्यात आलं. नेमबाजांसाठी सरकार इतकं उदासीन आहे, असं माहिती असतं तर स्वप्नीलला या खेळामध्ये पाठवलंच नसतं. भारतीय क्रिकेट संघानं टी-20 विश्वचषक जिंकल्यावर राज्य सरकारनं राज्यातील क्रिकेटपटूंना पाचव्या दिवशी 11 कोटी बक्षीस दिलं. पण स्वप्नीलसाठी दोन महिन्यांनी बक्षीस जाहीर करण्यात आलं.

स्वप्नील कुसाळेचे वडील सुरेश कुसाळे (Source - ETV Bharat Reporter)

महाराष्ट्रातील नेमबाजांचं दुर्दैव : यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत हरियाणासारख्या राज्यातील खेळाडूंनी 4 पदकं पटकावली, महाराष्ट्र राज्यात स्वप्नील या एकाच खेळाडूनं कांस्यपदक जिंकलं. असं असताना राज्य सरकारनं सुवर्णपदकास 5 कोटी, रौप्यपदकास 3 कोटी आणि कांस्यपदकास 2 कोटी जाहीर केले, पण ही रक्कम ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर दोन महिन्यांनी जाहीर केली. राज्यात कुणीच सुवर्णपदक पटकावलं नव्हतं, मग ही रक्कम सरकारनं कुणासाठी घोषित केली? हरियाणा राज्य इतकं लहान असूनसुद्धा त्यांनी राज्यातील खेळाडूंना मोठं बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. क्रिकेटपटूंना पाचव्या दिवशी विधिमंडळात बोलावून सत्कार केला जातो आणि स्वप्नीलनं पदक जिंकून 2 महिने झाले, तरी एक फूलसुद्धा देऊन त्याचा गौरव केला नाही. हे महाराष्ट्रातील नेमबाजांचं दुर्दैव म्हणावं लागेल, अशा उद्विग्न भावना सुरेश कुसाळे यांनी व्यक्त केल्यात.

एका दिवसाचा खर्च 30 हजारांच्या घरात : आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक मिळवायचं असेल, तर स्वप्निलला चांगल्या दर्जाची बंदूक आणि काडतूस उपलब्ध करून द्यावे लागतील. एका काडतुसाची किंमत 100 रुपये आहे, दिवसाला 300 काडतुसे सरावादरम्यान फायर करावी लागतात. त्यामुळं स्वप्नीलचा दिवसाचा खर्च 30 हजारांच्या घरात जातो. राज्य सरकारनं केलेली बक्षिसांची तरतूद तुटपुंजी आहे. पुण्यातील बालवाडी क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजला स्वप्नीलचं नाव द्यावं, क्रीडासंकुलाजवळ घर उपलब्ध करून घ्यावं, अशा मागण्याही सुरेश कुसाळे यांनी केल्यात.

हेही वाचा

  1. आयर्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका 'क्लीन स्वीप' करणार की आयरिश संघ प्रतिष्ठा राखणार? 'इथ' पाहा शेवटचा वनडे लाईव्ह - IRE VS SA 3rd ODI LIVE IN INDIA
  2. पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी जिंकणार? पहिला सामना भारतात 'इथं' दिसेल लाईव्ह - PAK vs ENG 1st TEST LIVE IN INDIA
  3. भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून केला पराभव, अर्शदीप सिंग - वरुण चक्रवर्तीची भेदक गोलंदाजी - India vs Bangladesh 1st T20I
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details