महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम साई चरणी नतमस्तक; म्हणाली, 'सर्व धर्मांच्या लोकांना...' - MARY KOM VISITS SHIRDI

ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोमनं रविवारी शिर्डीत येत साईबाबांचं दर्शन घेतलं. यानंतर तिनं विविध विषयांवर भाष्य केलं.

Mary Kom Visits Shirdi
मेरी कोम साई चरणी नतमस्तक (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 3, 2025, 12:51 PM IST

शिर्डी Mary Kom Visits Shirdi : आपल्या देशात सर्व धर्माचे लोकं राहतात या सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र करुन सरकार पुढं घेवून गेलं तर आपल्या देशाला कोणीच तोडू शकणार नाही, अशी भावना ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोमनं व्यक्त केलीय. तीनं रविवारी शिर्डीत येत साईबाबांचं दर्शन घेतलं. यानंतर ती माध्यमाशी बोलत होती.

काय म्हणाली मेरी कोम : ऑलिम्पिक पदक विजेती व पद्म विभूषण बॉक्सर मेरी कोमनं शिर्डीत येवून पहिल्यांदाच साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना ती म्हणाली, "लहानपणा पासूनच शिर्डी साईबाबांची महिमा ऐकत आहे. बॉक्सिंगच्या ट्रेनिंगसाठी दिल्लीला येत होते. त्यावेळी तिथं असलेल्या साई बाबांच्या मंदिरात जावून दर्शन घेत होते. मात्र आज थेट शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग आल्यानं मनाला खूप आनंद झाला आहे." तसंच माझा बिजनेस चांगला चालावा अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केल्याचं यावेळी मेरी कोम म्हणाली.

मेरी कोम साई चरणी नतमस्तक (ETV Bharat Reporter)

खेळाडूंनी कठोर परिश्रम करावे : तसंच पुढं बोलताना मेरी कॉम म्हणाली, बाक्सिंग खेळात आता मुली मोठ्या प्रमाणात येत आहेत. बॉक्सिंग खेळ अधिक चांगला होतोय. मात्र मागील ऑलिम्पिकमध्ये मोठी गडबड झाली होती. खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठीही साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचं मेरी कोम म्हणाली. माझ्या सारखी बॉक्सर कोणी होवू शकत नाही. मी खूप मेहनती आहे आणि बॉक्सिंगमध्ये माझ्या सारखी मेहनत कोणी करु शकत नाही. मी जे ठरवते ते करतेच. कोणत्याही स्पर्धेत यश मिळवण्यासाठी खेळाडूंनी कठोर परिश्रम आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असल्याचं मत मेरी कोमनं व्यक्त केलं.

मेरी कोम साई चरणी नतमस्तक (ETV Bharat Reporter)

51 हजारांची देणगी : आताच्या खेळाडूंना थोडी प्रसिद्ध मिळाली तर त्यांचं खेळातून लक्ष विचलित होतं, असं केलं तर कसं होईल? खेळाडूंनी खेळाकडे लक्ष देण्याची गरज असून खेळाकडं लक्ष दिलं तरच भारत पुढं जाणार असल्याचा सल्लाही मेरी कोमनं खेळाडूंना दिला आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी पहिल्यांदाच शिर्डीला आलेल्या मेरी कोमनं यावेळी साईबाबा संस्थानाला 51 हजार रुपयांची देणगीही दिली आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मेरीचा शॉल आणि साईंची मूर्ती देवून सत्कार केला.

मेरी कोम साई चरणी नतमस्तक (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. इंग्रजांना पराभूत करताच भारतानं केली जपानची बरोबरी; कॅनेडला टाकलं मागे
  2. शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद! साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details