महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

खेळाडूंना वेळेवर मदत मिळावी... ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेनं उपस्थित केला मोठा प्रश्न - Swapnil Kusale

Swapnil Kusale : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेनं खेळाडूंना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी वेळेवर मदत करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं.

Swapnil Kusale
स्वप्नील कुसाळे (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 30, 2024, 5:25 PM IST

पुणे Swapnil Kusale : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं खेळाडूंना वेळेवर मदत मिळण्याची गरज असून ज्यामुळं त्यांची कामगिरी सुधारण्यास मदत होईल, असं मत व्यक्त केलं. कुसाळेनं दीपाली देशपांडे यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन पुण्यात टीटीई म्हणून काम केलं. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रायफल नेमबाजीत कांस्यपदक जिंकून त्याने रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं.

काय म्हणाला स्वप्नील : स्वप्नीलनं "शूटिंग स्पोर्ट्समध्ये गुंतलेल्या खेळाडूला स्पर्धांना जाण्यासाठी उपकरणं, दारुगोळा आणि प्रवासावर खूप खर्च करावा लागतो," असं एका मीडिया निवेदनात म्हटलं आहे. वेळेवर मिळालेली मदत निःसंशयपणे खेळाडूची कामगिरी वाढवते, असंही त्यानं म्हटलं आहे. 29 ऑगस्ट रोजी भारतानं राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. इच्छुक खेळाडूंना तो काय संदेश देणार असं विचारलं असता, स्वप्नील म्हणाला, "खेळाडूंनी नेहमी पोषण आणि फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ समर्पण आणि कठोर परिश्रमानंच मोठं यश शक्य आहे."

2028 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा : स्वप्नील 2024 पॅरिसध्ये जिंकलेल्या कांस्यपदकावर समाधानी नाही. 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची त्याची इच्छा असल्याचं त्यानं म्हटलं. नाशिक आणि पुण्यात प्रशिक्षण घेतलेल्या या अनुभवी नेमबाजानं पुणेस्थित रावेतकर ग्रुपच्या अमोल रावेतकर यांची भेट घेतली आहे. ज्यांनी त्याला सुरुवातीच्या काळात साथ दिली होती. रावेतकर यांनी स्वप्नील कुसाळेला त्याच्या प्रशिक्षणासाठी मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांचं अनुदान जाहीर केलं. हा नेमबाज भारत आणि महाराष्ट्राला आणखी गौरव मिळवून देईल अशी आशा व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. जय श्रीराम म्हणून हिंदू संस्कृतीचं भक्कमपणे रक्षण केलं तरच हिंदुराष्ट्र मोठं होईल; स्वप्नील कुसाळेचं वक्तव्य चर्चेत - Swapnil Kusale on Hindu Rashtra
  2. ऑलम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात ग्रँड वेलकम; स्वागतानं भारावला कुसाळे परिवार - Swapnil Kusale
  3. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नीलच्या गावात दिवाळी; मायदेशी परतल्यानंतर 'असं' होणार स्वागत - paris olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details