महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लिश संघ कीवींचा पराभव करत 16 वर्षांनी मालिका जिंकत वचपा काढणार? 'इथं' पाहा लाईव्ह मॅच - NZ VS ENG 2ND TEST

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व इथं सुरु आहे.

NZ vs ENG 2nd Test Live Streaming
इंग्लंड क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 8, 2024, 12:31 AM IST

वेलिंग्टन NZ vs ENG 2nd Test Live Streaming : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व इथं सुरु आहे. या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे.

इंग्लंडकडं महाकाय आघाडी :वेलिंग्टन इथं खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघानं दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 378 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडकडं 533 धावांची महाकाय आघाडी आहे. या डावात इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आहेत. बेन डकेटनं 92, जेकब बेथेलनं 96 आणि हॅरी ब्रूकनं 55 धावा केल्या. तर जो रुटनं 73 धावा केल्या तर बेन स्टोक्स 35 धावा करुन क्रीजवर उपस्थित आहेत.

इंग्लंड डाव घोषित करणार ? : आता आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ किती धावांवर आपला डाव घोषित करतो हे पाहावं लागेल. जर त्यांनी डाव घोषित केला नाही तर यजमान संघाला त्यांच्या उर्वरित विकेट लवकर घ्याव्या लागतील. तसंच यानंतर जर हा सामना न्यूझीलंड संघाला जिंकायचा असेल तर त्यांना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांचं टार्गेट चेस करावं लागेल. चौथ्या डावात इतक्या धावांचं पाठलाग करण सोपं नाही. परिणामी तिसऱ्याच दिवशी इंग्लंडला सामना जिंकण्याची संधी असेल. यासह इंग्लंडचा संघ मालिकेवरही कब्जा करेल. इंग्लंडनं यापुर्वी 2008 मध्ये न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकली होती.

कीवींची टॉस जिंकत गोलंदाजी : तत्पूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 43 धावांवर संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर हॅरी ब्रूक आणि ऑली पोप यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढं नेली. हॅरी ब्रुकच्या शतकाच्या बळावर इंग्लंडचा पहिला डाव 54.4 षटकांत 280 धावांवर आटोपला.

पहिल्या डावात इंग्लंडची 155 धावांची आघाडी :पहिल्या डावात फलंदाजीला आलेला न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 34.5 षटकात केवळ 125 धावांवरच गारद झाला. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 53 धावा करुन संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. न्यूझीलंडकडून केन विल्यमसननं सर्वाधिक 37 धावांची खेळी खेळली. केन विल्यमसनशिवाय कर्णधार टॉम लॅथमनं 17 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंड संघानं 155 धावांची आघाडी घेतली होती.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ कधी सुरु होईल?

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा तिसरा दिवस रविवार 8 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजेपासून बेसिन रिझर्व, वेलिंग्टन इथं खेळला जाईल.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं आणि कसा पाहायचा?

सध्या भारतात टीव्हीवर न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी मालिकेचं थेट प्रक्षेपण करण्याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दोन्ही संघाची प्लेइंग 11 :

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साऊदी, मॅट हेन्री, विल्यम ओ'रुर्के.

इंग्लंड :झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रुट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.

हेही वाचा :

  1. 'थ्री लॉयन्स संघा'नं केला 'वर्ल्ड रेकॉर्ड'... क्रिकेटच्या इतिहासात नवा 'माईलस्टोन'
  2. जो 'रेकॉर्ड ब्रेकर' रुट... कीवींविरुद्ध 'अर्धशतकांचं शतक' झळकावत रचला इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details