हॅमिल्टन Nathan Smith Catch Video :क्रिकेटच्या मैदानावर अशी काही दृश्यं अनेकदा पाहायला मिळतात, ज्यामुळं प्रेक्षक थक्क होतात. आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यानंतर तुमचे होश नक्कीच उडून जातील. हा व्हिडिओ श्रीलंका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्याचा आहे. श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना न्यूझीलंडच्या एका खेळाडूनं असा झेल घेतला की, तुम्हीही कौतुक करण्यापासून थांबू शकणार नाही. याला आतापर्यंतच्या सर्वोत्तम झेलांपैकी एक म्हटलं तर आश्चर्य वाटणार नाही.
फील्डर मैदानावर झाला स्पायडर मॅन :श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना न्यूझीलंडच्या नॅथन स्मिथनं असा झेल घेतला ज्याचं सर्वांकडून कौतुक होत आहे. श्रीलंकेच्या डावातील 29 वं षटक विल ओ'रुर्कनं टाकलं. स्ट्राईकवर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी ईशान मलिंगा तिथं होता. विल ओ'रुर्कनं मलिंगाकडे चेंडू टाकला, त्यानं तो झटपट मारला. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन परत सीमारेषेच्या दिशेनं गेला. नॅथन स्मिथनं अप्रतिम चपळाई दाखवत हवेत उडी मारत चेंडू पकडला. स्मिथनं चेंडू पकडला तेव्हा तो पूर्णपणे हवेत होता. स्पायडर मॅनप्रमाणेच त्यानं हवेत असताना कॅच पूर्ण केला. यासह ईशान मलिंगाचा डाव संपुष्टात आला.