डल्लास (अमेरिका) NEP vs SCO ODI Live Streaming : ICC क्रिकेट विश्वचषक लीग दोन 2023-27 चा 44 वा सामना आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अमेरिकेतील डल्लास येथील मैदानावर खेळवला जाणार आहे.
दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी कशी : नेपाळनं या स्पर्धेत आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. ज्यात फक्त 2 जिंकले, 8 हरले आणि एक सामना अनिर्णित राहिला. परिणामी नेपाळ संघ 5 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडं, स्कॉटलंडनं आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. ज्यात 6 जिंकले आहेत आणि 4 हरले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे आणि संघ 13 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : नेपाळ आणि स्कॉटलंडचे संघ वनडेत आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात नेपाळनं चार सामने जिंकले आहेत. तर स्कॉटलंडनं तीन सामने जिंकले आहेत. हे ज्ञात आहे की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा स्पर्धा बरोबरीची असते. याशिवाय गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर स्कॉटलंडनं त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. तर नेपाळनं तीन सामने जिंकले आहेत. नुकताच 29 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. ज्यात नेपाळनं स्कॉटलंडचा 5 विकेट्सनं पराभव केला.
नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मधील 44वा सामना कधी खेळला जाईल?
नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 चा 44 वा सामना आज सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील डल्लास इथं भारतीय वेळेनुसार रात्री 9:00 वाजता खेळवला जाईल.