पर्थ 18 Batters of India out on Zero : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघत पर्थ इथं खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी असं काही पाहायला मिळालं की ज्याची अपेक्षा कोणीही केली नसेल. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 150 धावांत गडगडला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियानंही अवघ्या 67 धावांत 7 विकेट गमावल्या. अशा प्रकारे संपूर्ण दिवसात एकूण 17 विकेट पडल्या. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी एकही अर्धशतक झळकावलं नाही पण 5 मोठ्या गोष्टी नक्कीच पाहायला मिळाल्या, जाणून घ्या त्यांची माहिती.
भारतीय संघाचा 150 चा लाजिरवाणा आकडा : पर्थमध्ये भारतीय संघ अवघ्या 150 धावांवर ऑल आउट झाला. जी ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी सिडनीमध्येही भारतीय संघ 150 धावांत आटोपला होता. हा सामना 2000 साली झाला होता. 1947 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियात दुसऱ्या डावातही भारतीय संघ 58 धावांत ऑलआऊट झाला होता.
इतकी वाईट स्थिती पहिल्यांदाच :भारतीय संघ यंदा पाचव्यांदा कसोटी सामन्यात 160 पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला आहे. याआधी केवळ 1952 आणि 1959 मध्ये भारतीय संघाची कसोटी सामन्यांमध्ये अशी वाईट स्थिती झाली होती.
18 फलंदाज शुन्य धावांवर बाद :जैस्वाल, पडिक्कल पर्थ कसोटीत शून्यावर बाद झाले. यासह यावर्षी भारताचे 18 फलंदाज कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी आहे. याआधी 2008 आणि 1983 मध्ये कसोटी सामन्यात 17 भारतीय फलंदाज शून्यावर बाद झालं होतं.