ETV Bharat / state

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मोठी कारवाई! बीड जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, एसआयटीमधून दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या कारावाईला वेग आला असून बीड जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातील एसआयटीमधील दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलीय.

Santosh Deshmukh Murder Case Updates beed four police officers has been transferred and Two SIT employees dismissed
बीड जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 12:35 PM IST

बीड : कर्तव्यावर असलेल्या राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांनी योग्यवेळी जर तक्रार नोंदवून घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता, असं मत धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केलं. त्यानंतर आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. घटना घडली तेव्हा या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्षपणे काम केलं नाही. त्यामुळं संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता.

पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या : केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची विनंतीवरुन नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलीय. तर पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची केज पोलीस स्टेशन प्रभारी, पोलीस निरीक्षक सय्यद मजहरअली अबुतालीब यांची नियंत्रण कक्षातून परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी, पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची नियंत्रण कक्षातून केज पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.

गणेश मुंडेची पुण्यात बदली : या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांच्यासहीत सर्वांनीच आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडं तक्रार करत बीडमधील स.पो.नि.गणेश मुंडे आणि स.पो.नि. दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता API गणेश मुंडे यांची महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरुन पुणे येथे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

एसआयटीमधील बीडच्या दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी : संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केलीय. यामध्ये बीडमधील काही कर्मचारी कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादीचे आमदार (एसपी) जितेंद्र आव्हाड यांनी काही पोलीस हे वाल्मिक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप केला. त्यांनतर मनोज वाघ आणि महेश विघ्ने या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना एसआयडीमधून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. "बीडमधील प्रकरणात सरकारमधील मंत्र्यांकडून प्रोत्साहन...", पृथ्वीराज चव्हाण यांचा महायुतीवर निशाणा
  2. संतोष देशमुख हत्याकांड : सुरेश धस यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'आका वापरायचा 17 मोबाईल फोन'
  3. बीडमधील पोलीस प्रशासनातील अधिकारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; तर मुंडे समर्थकांच्या तक्रारीनंतर मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.