नवी दिल्ली Manu Bhaker Neeraj Chopra Marriage : नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा व्हिडिओ भारतात सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकचे दोन्ही पदक विजेते हसताना आणि एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर भलतीच चर्चा सुरू झाली. दरम्यान नेटकऱ्यांनी 'दोघंही लग्न करणार आहेत', 'रिलेशनशिप पक्कं झालं' अशा कमेंट करायला सुरुवात केलीय.
मनू भाकरची आई सुमेधा भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या भेटीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये नीरज चोप्रा आणि मनू भाकरची आई यांच्यात चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडीओत मनू भाकरची आई नीरज चोप्राचा हात आपल्या डोक्यावर ठेवताना दिसत आहे. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलेलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहे.
मनू भाकरचे वडील म्हणाले : मनू भाकरचे वडील राम किशन यांनी सांगितलं की, "मनू अजूनही खूप लहान आहे. ती लग्नाच्या वयाचीही नाही. आत्ता त्याबद्दल आम्ही विचारही करत नाही आहोत. मनूची आई नीरजला आपल्या मुलाप्रमाणे मानते," असं वक्तव्य करत मनूच्या वडीलांनी नीरज आणि मनूच्या लग्नाच्या अफवांना फेटाळून लावलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकार आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत 2 कांस्यपदकं जिंकली. टोकियो ऑलिम्पिक 2020 चा चॅम्पियन स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं या ऑलिंपिकमध्ये 89.45 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकलं.
हेही वाचा
- 'बहाणे बनवण्यात सुवर्णपदक...', ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीवर गावस्कर संतापले - Paris Olympics 2024
- 'माझं वजन 100 ग्रॅमने वाढलं कारण...' विनेश फोगाटचा मोठा खुलासा - Paris Olympic 2024
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत खासदारानं जिंकलं 'कांस्यपदक'; टोकियो आणि रिओ ऑलिम्पिकमध्येही जिंकली आहेत पदकं - Paris Olympic 2024