मुंबई Govt Allots Bandra Plot to Ajinkya Rahane : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी (23 सप्टेंबर) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे परिसरात भूखंड देण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. दरम्यान, यामागची नेमकी कारण काय आहेत? यासंदर्भात जाणून घेऊया.
2 हजार चौरस मीटरचा भूखंड : मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन येथील 2000 चौरस मीटरचा भूखंड अजिंक्य रहाणेला देण्यात आलाय. हा भूखंड 30 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात आला आहे. याआधी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी 1988 साली तत्कालीन सरकारनं हा भूखंड दिला होता. मात्र, या भूखंडावर कोणतंही काम न झाल्यानं शासनानं हा भूखंड परत घेतला. म्हाडा प्राधिकरणानं ठराव करून हा भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला देण्याची शिफारस सरकारकडं केली होती. तर या जागेच्या वापरामुळं नवीन क्रिकेटपटू घडावेत आणि क्रिकेट या खेळासाठी या जागेचा वापर व्हावा. यासाठी हा भूखंड आता राज्य सरकारनं क्रिकेटपट्ट अजिंक्य रहाणेला दिला आहे.