महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC क्रमवारीत भयंकर उलथापालथ; तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्तीची लॉटरी - LATEST ICC RANKINGS

आयसीसीनं नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या वर्षीच्या T20 क्रमवारीत अनेक बदल दिसून येत आहेत. विशेषतः टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्मानं इतिहास रचला आहे.

Latest ICC Rankings
ICC क्रमवारीत भयंकर उलथापालथ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 29, 2025, 3:16 PM IST

दुबई Latest ICC Rankings : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात सध्या 5 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांची मालिका सुरु आहे. दरम्यान, आयसीसीनं नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या वर्षीच्या T20 क्रमवारीत अनेक बदल दिसून येत आहेत. विशेषतः टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्मानं इतिहास रचला आहे. त्यानं एका स्थानाची झेप घेतली आहे आणि यासह तो आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

आयसीसी T20 क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड अव्वल : आयसीसीनं जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड पहिल्या स्थानावर आहे. त्याचं रेटिंग सध्या 855 आहे. दरम्यान, तिलक वर्मा एका स्थानानं पुढं सरकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचं रेटिंग आता थेट 832 वर पोहोचलं आहे. तिलक वर्मा पहिल्यांदाच आयसीसी T20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर त्याचं रेटिंग 844 पर्यंत पोहोचलं असलं तरी, जास्त धावा न काढता आऊट झाल्यामुळं आणि तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यामुळं त्याचं रेटिंग 832 पर्यंत खाली आले आहे. यानंतरही तो आता ट्रॅव्हिस हेडच्या खूप जवळ आला आहे आणि त्याच्या नंबर वन स्थानाला धोकाही वाढला आहे.

भारताचा वरुण चक्रवर्ती पहिल्यांदाच टॉप-5 मध्ये : आयसीसीच्या ताज्या T20 गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्ती 5व्या क्रमांकावर आला आहे. त्याचं 679 रेटिंग गुण आहेत. इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा टॉप 5 मध्ये समावेश नाही. पण, जर आपण टॉप 10 बद्दल बोललो तर, वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांची नावं देखील आयसीसी T20 गोलंदाजांच्या क्रमवारीत दिसतात. अर्शदीप सिंग नवव्या स्थानावर आहे. तर रवी बिश्नोई आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर आहे.

आदिल रशीद अव्वल स्थानी : आयसीसीच्या नवीन T20 गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या क्रमांकावर आहे. या इंग्लिश फिरकी गोलंदाजाचे 718 रेटिंग गुण आहेत. दरम्यान, वेस्ट इंडिजचा अकील हुसेन 707 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा 698 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अॅडम झांपा 694 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. म्हणजेच, एकूणच, आयसीसी T20 गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटूंचं वर्चस्व आहे.

हार्दिक पांड्या अव्वल :राजकोट T20 सामन्यापासून हार्दिक पांड्या चुकीच्या कारणांमुळं चर्चेत आहे. राजकोट T20 मधील पराभवासाठी हार्दिक पांड्यावर टीका होत आहे, पण सामना संपल्यानंतर अवघ्या 14 तासांतच त्याला होणाऱ्या शिव्या आता टाळ्यांमध्ये बदलल्या आहेत. कारण टीम इंडियाचा हा अष्टपैलू खेळाडू नंबर 1 बनला आहे. बुधवारी आयसीसीनं जाहीर केलेल्या रॅकींकमध्ये हार्दिक पांड्या जगातील नंबर 1 T20 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. हार्दिक पांड्या 255 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा :

  1. स्टीव्ह 'रन मशीन' स्मिथ... लंकेविरुद्ध एक धाव घेताच सचिन, द्रविडला टाकलं मागे
  2. वरुण 'रेकॉर्ड ब्रेक' चक्रवर्ती... टीम इंडियाच्या पराभवातही पठ्ठ्यानं केले विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details