कोलकाता IPL 2024 KKR vs SRH : यंदाच्या आयपीएल हंगामातील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम कोलकाताला फलंदाजीचा आमंत्रण दिलं. फलंदाजीचा आमंत्रण मिळाल्यानंतर कोलकातानं निर्धारित 20 षटकात 208 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला 204 धावा करता आल्या. हैदराबादचा संघ विजयापासून अवघ्या 4 धावांनी मागं राहिला. परिणामी कोलकातानं या हंगामाची विजयी सुरुवात केलीय.
श्वास रोखून धरणारं शेवटचं षटक : शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता होती. यावेळी अर्धशक्ती खेळी करणाऱ्या हेनरिक क्लासेननं पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत हैदराबादचा विजय निश्चित केला. मात्र त्यानंतर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षित राणानं शहाबाज अहमदला बाद करत सामन्यात रंगत आणली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर फलंदाजीसाठी आलेल्या मारको यांसन यान एक धाव काढून हेनरिक क्लासेसला स्ट्राइक दिली. मात्र पाचव्या चेंडूवर हेनरिक क्लासेनही बद झाला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज असताना हर्षित राणानं या चेंडूवर एकही धाव न देता आपल्या संघाला चार धावांनी विजय मिळवून दिला.
हैदराबादची सावध सुरुवात : 208 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात आक्रमक झाली नाही सलामीवीर मयंक अग्रवाल (32) आणि अभिषेक शर्मा (32) यांनी काही आकर्षक फटके मारत पावर प्ले मध्ये 60 धावा जोडल्या. मात्र हर्षित राणानं मयंक अग्रवालला बात करून ही जोडी फोडली. त्यानंतर फलंदाजीत करिष्मा दाखवलेल्या आंद्रे रसेलनं अभिषेक शर्माला बाद केलं. मधल्या षटकांत वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरीन यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात प्रत्येकी एका फलंदाजाला अडकवलं. हेनरिक क्लासेन वगळता हैदराबादचा एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. त्यानं 29 चेंडूत आठ षटकारांचा तडाखा देत 63 धावांची खेळी केली. शाहबाज अहमदनही अवघ्या 5 चेंडूत 16 धावा केल्या. शेवटच्या तीन षटकांमध्ये हेनरिक क्लासेन आणि शाहबाज अहमद यांनी अवघ्या 16 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली. मात्र त्यांचा संघ विजयापासून चार धावांनी दूरच राहिला. विशेष म्हणजे हैदराबाद संघांनं या हंगामात ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स याच्या खांद्यावर आपल्या संघाची धुरा सोपवली. मात्र विश्वचषकातील जलवा त्याला आयपीएल मध्ये दाखवता आला नाही.
आंद्रे रसेलच्या आक्रमक खेळीच्या बळावर कोलकाताचा धाव डोंगर : नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीचंज्ञआमंत्रण मिळालेल्या कोलकाता संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या चौथ्याच षटकात टी नटराजन यानं व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांना बाद करत कोलकत्ता संघाला अडचणीत आणलं. मात्र त्यानंतर फलंदाजी झालेल्या रमनदीप सिंग यानं सलामीवीर फिलिप सॉल्टच्या साथीनं डाव सावरला. दोघांमधील भागीदारी मोठी होत असतानाच फिरकीपटू मयंक मार्कंडेनं रमनदिप सिंगला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर सलामीवीर फिलिप सॉल्टही अर्धशतकी खेळी करून मार्कंडेचा बळी ठरला. मात्र शेवटच्या चार षटकांमध्ये अष्टपैलू आंद्रे रसेल आणि युवा रिंकू सिंग यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत तब्बल 78 धावा कुटल्या. यामुळं संघाला निर्धारित 20 षटकांत 208 धावांची मजल मारता आली. कोलकाता नाईट रायडर्स कडून आंद्रे रसेलनं अवघ्या 25 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांची आताशबाजी करत नाबाद 64 धावांची खेळी केली. तर सलामीवीर फिलिप सॉल्ट यानही 54 धावांची खेळी केली. हैदराबाद कडून वेगवान गोलंदाज टी नटराजन यानं 3 तर फिरकीपटू मयंक मार्कंडे यानं 2 बळी घेतले.
हेही वाचा :
- पंजाब किंग्जची दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सनं मात, खलील अहमदची हॅटट्रिक हुकली - ipl 2024
- नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या चेन्नईची विजयी सुरुवात - IPL 2024 OPENING MATCH