महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'गोलंदाज' कागिसो रबाडाचं कसोटीत वेगवान त्रिशतक; बांगलादेशविरुद्ध रचला इतिहास

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडानं मुशफिकर रहीमला आउट करताच, तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 300 विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

Fastest 300 Wickets in Test Cricket
कागिसो रबाडा (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : 10 hours ago

ढाका Fastest 300 Wickets in Test Cricket : क्रिकेटमध्ये रेकॉर्ड तोडण्यासाठीच बनतात असे म्हटलं जातं. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं हे खरं करुन दाखवलं आहे. बांगलादेशविरुद्ध ढाका इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कागिसो रबाडानं दुसरी विकेट घेताच कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण केले. मोठी गोष्ट म्हणजे या विकेटसह रबाडानं विश्वविक्रमही मोडला. कागिसो रबाडा आता सर्वात कमी चेंडूत 300 बळी घेणारा गोलंदाज ठरला. रबाडानं पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसचा विक्रम मोडला.

कागिसो रबाडाचा विश्वविक्रम : कागिसो रबाडानं 11 हजार 817 चेंडूत 300 विकेट्स पूर्ण करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम वकारच्या नावावर होता. त्यानं 12 हजार 602 चेंडू टाकून 300 कसोटी बळी पूर्ण केले होते. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेननं 12 हजार 605 चेंडूत 300 कसोटी बळी पूर्ण केले होते. रबाडा केवळ 29 वर्षांचा असून या खेळाडूनं केवळ 22.04 च्या गोलंदाजीची सरासरी आणि केवळ 39.39 च्या स्ट्राईक रेटनं 300 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

रबाडाला अश्विनचा विक्रम मोडता आला नाही :कसोटी सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर सर्वात कमी सामन्यात 300 कसोटी बळी घेण्याचा विक्रम भारताच्या आर अश्विनच्या नावावर आहे. अश्विननं अवघ्या 54 कसोटी सामन्यांमध्ये विकेट्सचं त्रिशतक झळकावलं होतं. डेनिस लिलीनं 56 सामन्यांमध्ये तर मुथय्या मुरलीधरननं 58 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेसाठी डेल स्टेननं 61 कसोटीत 300 कसोटी बळी घेण्याचा चमत्कार केला आहे. तर रबाडानं आपल्या 65व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.

मॉर्केल-ॲलनला डोनाल्डला मागे टाकण्याची संधी : कागिसो रबाडाकडे आता आपल्या देशातील दोन दिग्गज वेगवान गोलंदाजांना मागे टाकण्याची संधी आहे. मॉर्नी मॉर्केलच्या नावावर 309 कसोटी विकेट आहेत, तर डोनाल्डच्या नावावर 330 कसोटी बळी आहेत. आता रबाडा त्यांना लवकरच मागे टाकू शकतो. डेल स्टेननं दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक कसोटी बळी घेतले आहेत. स्टेनच्या नावावर 439 कसोटी विकेट आहेत.

हेही वाचा :

  1. पुण्यात पाच वर्षांनी होणार कसोटी मॅच, रेल्वे दराच्या किंमतीत मिळतंय सामन्याचं तिकीट; कसं खरेदी करायचं ऑनलाइन आणि ऑफलाइन?

ABOUT THE AUTHOR

...view details