पुणे How To Buy IND vs NZ 2nd Test Match Tickets : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 2019 मध्ये भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शेवटची कसोटी खेळली गेली होती. आता प्रदीर्घ कालावधीनंतर या मैदानावर कसोटी सामना रंगणार असून, तमाम क्रिकेटप्रेमी आगामी सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटे कशी खरेदी करावी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर याचं उत्तर या बातमीत मिळेल.
New Zealand win the First Test by 8 wickets in Bengaluru.#TeamIndia will look to bounce back in the Second Test.
— BCCI (@BCCI) October 20, 2024
Scorecard ▶️ https://t.co/8qhNBrs1td#INDvNZ | @idfcfirstbank pic.twitter.com/6Xg4gYo8It
पहिल्या सामन्यात भारताचा पराभव : बेंगळुरु इथं झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सनी पराभूत झाल्यानंतर भारत आता पुण्यातील कसोटी सामना जिंकत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल. तसंच 2012 मध्ये या मैदानाच उद्घाटन झालं. त्यानंतरचा या मैदानावरील हा तिसरा कसोटी सामना असेल. 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित करण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. तर दुसरीकडे 36 वर्षानंतर भारतात कसोटी सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - 16 ते 20 ऑक्टोबर (न्यूझीलंड 8 विकेटनं विजयी)
- दुसरी कसोटी - 24 ते 28 ऑक्टोबर (एमसीए स्टेडियम, पुणे)
- तिसरी कसोटी - 1 ते 5 नोव्हेंबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
किती रुपये तिकिटाची किंमत : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या सीझन तिकिटांची किंमत 1250 रुपयांपासून सुरु होईल आणि स्टँडनुसार किंमत 5000 रुपयांपर्यंत जाईल. याव्यतिरिक्त, चाहत्यांना प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र तिकिटं खरेदी करण्याचा पर्याय देखील असेल, ज्याच्या किमती 499 रुपयांपासून सुरु होतील. जे रेल्वेच्या तिकिटापेक्षाही कमी दरात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुणे इथं होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याची तिकिटं insider या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसंच MCA च्या अधिकृत वेबसाइटवर तिकिटं उपलब्ध असतील. तर ऑफलाइन तिकीट उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, बेन सियर्स , ईश सोधी, टिम साउथी, केन विल्यमसन आणि विल यंग.
हेही वाचा :