ETV Bharat / sports

W, W, W... भारताच्या युवा गोलंदाजाचा आशिया चषकात UAE विरुद्ध कहर; एकाच षटकात फिरवला सामना

ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धेचा आठवा सामना आज भारत A राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध UAE राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात सुरु आहे.

Rasikh Salam 3 Wickets in 1 Over
रसिक सलाम (Screenshot from social media)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 6 hours ago

Updated : 3 hours ago

अल अमेरत Rasikh Salam 3 Wickets in 1 Over : ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धेचा आठवा सामना आज भारत A राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध UAE राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात सुरु आहे. उभय संघांमधील हा सामना अल अमेरत येथील अल अमेरत क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. या सामन्यात युएईच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय भारताच्या युवा गोलंदाजांनी चुकीचा ठरवला.

रसिक सलामची घातक गोलंदाजी : या सामन्यात भारतीय गोलंदाज रसिक सलामला डावाच्या सहाव्या षटकात गोलंदाजी दिली. यानंतर त्यानं ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. तसंच त्यानंतर याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर त्यानं आणखी एक विकेट घेतली. अशा प्रकारे त्यानं एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेऊन युएई संघाचं कंबरडं मोडलं. रसिक सलाम हा मुळचा जम्मू-काश्मीरचा असून त्यानं यापुर्वी आपली प्रतिभा दाखवली आहे.

IPL मध्ये पाडली छाप : रसिक सलामनं यापुर्वी IPl मध्येही अनेक संघांचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. त्यानं IPL मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यात 9 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपीटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.

भारतीय युवा संघाची विजयी सुरुवात : भारत अ संघानं या स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. भारत अ संघानं पहिल्या सामन्यात पाकिस्तान अ संघाचा 7 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत भारत अ संघाला दुसऱ्या सामन्यात यूएईचा पराभव करुन दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीनंही पहिल्या सामन्यात ओमानचा 4 विकेट राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला. अशा स्थितीत यूएई संघ भारत अ संघाला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करत आणखी एक विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळं दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. ना दुबई, ना लंडन... 'या' शहरात पहिल्यांदाच होणार IPL 2025 मेगा लिलाव, तारीखही ठरली; BCCI चा मोठा निर्णय

Last Updated : 3 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.