ETV Bharat / state

ठाण्यात 'हिट अँड रन' ; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, वाहन चालक फरार - THANE ACCIDENT

ठाण्यात हिट अँड रनचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. यात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. नितीन कंपनी जंक्शनवर ही घटना घडली.

THANE ACCIDENT
२१ वर्षीय तरुणाचा मृत्यू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2024, 9:22 PM IST

ठाणे : नाशिक मुंबई महामार्गावरून मुंबईकडं भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्चडीस कारने दुचाकीस्वाराला धडक देऊन पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत २१ वर्षीय दर्शन शशीधर हेगडेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मर्चडीस कार चालकाच्या विरोधात 'हिट अँड रन' चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नौपाडा पोलिस फरारी वाहन चालकाचा शोध घेत आहे.

प्रतिक्रिया देताना मृतकाचा भाऊ (ETV Bharat Reporter)

काय आहे घटना : मृतक दर्शन शशीधर हेगडे हा नितीन जंक्शन येथे सोमवारी पहाटे १-५० वाजण्याच्या सुमारास दुचाकी टीव्हीएस ज्युपिटरवर बसला होता. यावेळी थार आणि मर्चडीस कारन भरधाव वेगाने मुंबईकडं निघाली होती. दोन्ही कार नितीन कंपनी जंक्शन जवळ आल्यानंतर दुचाकीवरील दर्शन हेगडेच्या दुचाकीला धडक दिली. यात दर्शन गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित घटनास्थळावरील रिक्षा चालक मनीष यादव यांनी रिक्षातून ठाण्याच्या कौशल्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं. परंतु त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला. तर ठाण्यातील या प्रकरणामुळं परिसरात एकाच खळबळ उडाली.

वर्तकनगर परिसरातही १० दिवसापूर्वी 'हिट अँड रन' : ११ आक्टोबर रोजी ठाण्याच्या इंदिरा नगर, वर्तकनगर परिसरात मध्यरात्री एका लाल रंगाच्या कारने शंकर गौडा नावाच्या तरुणाला मागून जोरदार धडक दिली होती. या घटनेत तरुण उडून बोनेटवर पडला होता. त्यानंतर कार चालकाने धूम ठोकली होती. तोपर्यंत रस्त्यावरील नागरिक आले होते. मात्र सुदैवाने यात शंकर गंभीर जखमी झाला नाही. याबाबत शंकर गौडा पोलीस ठाण्यात तक्रार केली की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र या हिट अँड रनचा व्हिडियो व्हायरल झाला आहे.

हेही वाचा -

  1. 'ऑडी' अपघात प्रकरणी मुलावर कारवाई होणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी थेटच सांगितलं... - Chandrashekhar Bawankule
  2. अपघातावेळी ऑडीमध्ये कोण होतं? अखेर नागपूर पोलिसांनी केला खुलासा - Audi Hit and Run Case
  3. मुंबईत पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारच्या धडकेत 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू - Mumbai Hit and Run

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.