मुंबई IPL 2025 Mega Auction Vennue : IPL 2025 च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. अशा परिस्थितीत या लीगमध्ये सहभागी होणारे चाहते आणि खेळाडू त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. यासाठी BCCI नं नुकतेच रिटेनशन नियमही जाहीर केले. मात्र, मेगा लिलाव कधी आणि कुठं होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण आता याबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे, ज्यात मेगा लिलावाचं ठिकाण आणि तारीख कळली आहे. क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाची राजधानी रियाध हे या कार्यक्रमासाठी सर्वात पसंतीचं ठिकाण मानले जात असून BCCI लवकरच याला मान्यता देऊ शकते.
🚨 IPL AUCTION ON 24TH AND 25TH NOVEMBER IN RIYADH...!!! 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2024
- The BCCI explored conducting the auction in London, Singapore, Vienna and Dubai, but Saudi Arabia believed to have been zeroed in. (Cricbuzz). pic.twitter.com/ARFDJ9yr0J
रियाध आणि जेद्दाह शहर आघाडीवर : मेगा लिलावासाठी BCCI सौदी अरेबियातील रियाध आणि जेद्दाह या दोन शहरांची पाहणी करत आहे. यामध्ये रियाधचं नाव आघाडीवर असून काही दिवसांत BCCI त्याला मान्यता देऊ शकते, अशी शक्यता आहे. वृत्तानुसार, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दोन्ही शहरांना भेट दिली आहे. तसंच हे अधिकारी पुन्हा एकदा त्यांची तपासणी करण्यासाठी जाऊ शकतात. त्यानंतर स्थळ निश्चित केलं जाईल. क्रिकबझच्या अहवालानुसार, IPL 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होऊ शकतो. मात्र, BCCI नं अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
4 शहरं नाकारली : BCCI नं यापूर्वी लंडन, दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील एका शहराचा IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी ठिकाण म्हणून विचार केला होता. मात्र, आता या चार शहरांना यादीतून वगळण्यात आले आहे. क्रिकबझच्या मते, लंडनला हवामानामुळं यादीतून काढून टाकण्यात आले. तर टाइम झोनमधील प्रचंड फरकामुळं ऑस्ट्रेलियाला वगळण्यात आलं आहे. वास्तविक, BCCI ला भारतीय वेळेनुसार दुपारी लिलावाची वेळ ठेवायची आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या वेळेत बराच फरक आहे. याशिवाय ब्रॉडकास्टर्सचीही यात मोठी अडचण झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. याच दरम्यान BCCI ला एक मेगा लिलाव करायचा होता आणि दोघांचा ब्रॉडकास्टिंग पार्टनर डिस्ने स्टार आहे. IPL चा शेवटचा लिलाव दुबईत पार पडला. यावेळी बोर्डाला इथं मेगा लिलाव करायचा नाही.
हेही वाचा :