जोहान्सबर्ग JSK vs PC 10th Match Live Streaming : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या SA20 स्पर्धेतील दहावा सामना आज म्हणजेच 16 जानेवारी रोजी जोबर्ग सुपर किंग्ज आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्गमधील वँडरर्स स्टेडियमवर खेळला जाईल.
दोन्ही संघाची आतापर्यंत कामगिरी कशी : जोबर्ग सुपर किंग्जनं आतापर्यंत या स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. ज्यात दोघांनीही विजय मिळवला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये, जोबर्ग सुपर किंग्जचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे, प्रिटोरिया कॅपिटल्सनं स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत. ज्यात 1 विजय, 1 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे. प्रिटोरिया कॅपिटल्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. परिणामी दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : 2023 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून जोबर्ग सुपर किंग्ज आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. यात काही प्रमाणात जोबर्ग सुपर किंग्ज संघाचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं. जोबर्ग सुपर किंग्जनं चारपैकी 2 सामने जिंकले आहेत तर एक सामना प्रिटोरिया कॅपिटल्सनं जिंकला आहे. तसंच दोन्ही संघातील एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
आयपीएलच्या धर्तीवर सुरु झाली लीग : आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2023 पासून टी 20 लीग सुरु झाली. आयपीएलच्याच मालकांनी या लीगचे सर्व संघ विकत घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सनं पर्ल संघ विकत घेतला. यासह एमआय केप टाऊन, जॉबर्ग सुपर किंग्स, डर्बन सुपर जायंट्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप या संघांचा या लीगमध्ये समावेश आहे.
जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील दहावा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील स्पर्धेतील दहावा सामना आज जोहान्सबर्ग येथील वँडरर्स स्टेडियम इथं खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होईल. याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.