रांची High Court Issues Notice To MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 2025 तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, झारखंड उच्च न्यायालयानं मंगळवारी महेंद्रसिंग धोनीला त्याचे माजी भागीदार मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी दाखल केलेल्या प्रकरणात नोटीस बजावली. न्यायालयानं भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण : दिवाकर आणि दास हे 'अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेड'चे संचालक आहेत आणि धोनीच्या नावानं क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी त्यांनी त्याच्याशी करार केला होता. धोनीनं 5 जानेवारीला रांचीमध्ये दोघांविरुद्ध फसवणुकीचा आरोप करत फौजदारी तक्रार दाखल केली होती. तक्रार अर्जात त्यांनी आरोप केला आहे की 2021 मध्ये त्यांचे अधिकार रद्द केल्यानंतरही या दोघांनी त्यांचं नाव वापरणं सुरु ठेवलं. 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या क्रिकेटपटूनं केला आहे. दिवाकर आणि दास यांनी रांची येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध घेतलेल्या दखलला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली.