History in Ranji Trophy :सध्या रणजी ट्रॉफी 2024 मध्ये उत्तर प्रदेश आणि केरळ यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात जलज सक्सेनानं केरळ संघासाठी शानदार गोलंदाजी करत पाच विकेट घेत उत्तर प्रदेशला 162 धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या दमदार गोलंदाजीसमोर उत्तर प्रदेशचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले.
जलज सक्सेनानं पहिल्या डावात घेतल्या पाच विकेट : जलज सक्सेनानं पहिल्या डावात 5 विकेट घेत इतिहास रचला असून रणजी ट्रॉफीमध्ये त्यानं 400 बळी पूर्ण केले आहेत. त्यानं यापूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये 6000 धावा केल्या आहेत. जलज सक्सेना रणजी ट्रॉफीमध्ये 400 बळी घेणारा आणि 6000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्यापूर्वी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती.
2005 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण : जलज सक्सेनानं 2005 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो मध्य प्रदेशकडून खेळला. पदार्पणाच्या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. आतापर्यंत त्यानं 143 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 6795 धावा केल्या आहेत, ज्यात 14 शतकं आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 194 धावा आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं झाले तर त्याने 143 प्रथम श्रेणी सामन्यात 452 विकेट घेतल्या आहेत. तो त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखला जातो.
भारतीय संघात स्थान नाही : 2016 नंतर जलज सक्सेना रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळू लागला. यानंतर त्यानं चमकदार कामगिरी केली आणि आपल्या कारकिर्दीत कधीही मागं वळून पाहिले नाही. विशेष म्हणजे दोन दशकं देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्यानंतरही त्याला भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. रणजी ट्रॉफीमध्ये 400 विकेट्स पूर्ण करणारा तो 13वा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा :
- 141 चेंडू शिल्लक ठेवत पाकिस्तानचा सात वर्षांनी दणदणीत विजय; विश्वविजेत्या 'कांगारुं'नी पाहिला सर्वात लाजिरवाणा दिवस
- विश्वविजेत्या 'कांगारुं'चा 90 चेंडूंआधीच खुर्दा; पाकिस्तान ऑस्ट्रेलियात इतिहास रचणार?