जेद्दाह IPL 2025 Mega Auction Players List : आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये खेळण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. अनेक स्टार खेळाडूंनी यात खेळून आपलं करिअर घडवलं आहे. आयपीएल युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करतं, जेणेकरुन ते त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करु शकतील. आयपीएल 2025 मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया इथं आज आणि उद्या होणार आहे. ज्यावर देश आणि जगाच्या नजरा खिळल्या आहेत.
पंतनं रचला इतिहास : या लिलावात सर्वांच्या नजरा ऋषभ पंतवर खिळल्या होत्या. पंतला लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघानं सोडलं होतं. त्याच्यावर मोठी बोली लावली जाणार हे निश्चित होतं आणि नेमकं तेच झालं. लखनऊ सुपर जायंट्स संघानं पंतला तब्बल 27 कोटी रुपयांत खरेदी केलं. 2016 नंतर पंत पहिल्यांदाच दिल्लीशिवाय अन्य संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंत अलीकडं उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी कार अपघातानंतर परतल्यानंतर त्यानं खूप धावा केल्या. लखनऊचा संघ त्याला कर्णधार बनवू शकतो.
- अर्शदीप सिंग : 18 करोड, पंजाब किंग्ज
- कगिसो रबाडा : 10.75 करोड, गुजरात टायटन्स
- श्रेयस अय्यर : 26.75 करोड, पंजाब किंग्ज
- जॉस बटलर : 15.75 करोड, गुजरात टायटन्स
- ऋषभ पंत : 27 करोड, लखनऊ सुपर जायंट्स
- मिचेल स्टार्क : 11.75 करोड, रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु
- मोहम्मद शमी : 10 करोड,सनराइजर्स हैदराबाद
- युजवेंद्र चहल : 18 करोड, पंजाब किंग्ज
- मोहम्मद सिराज : 12.25 करोड, गुजरात टायटन्स
- डेविल मिलर : 7.50 करोड, लखनऊ सुपर जायंट्स
- हैरी ब्रूक : 6.25 करोड, दिल्ली कॅपिटल्स
- देवदत्त पड्डिकल : बोली नाही
- लियम लिव्हिंगस्टोन : 8.75 करोड, रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु
- डेव्हॉन कॉन्वे : 6.25 करोड, चेन्नई सुपर किंग्स
- ऐडन मार्कराम : 2 करोड, लखनऊ सुपर जायंट्स
- जॅक फ्रेझर मॅकगर्क : 9 करोड, दिल्ली कॅपिटल्स
- रचिन रवींद्र : 4 करोड, चेन्नई सुपर किंग्स
- हर्षल पटेल : 8 करोड, सनराइजर्स हैदराबाद
- रवी अश्विन : 9.75 करोड, चेन्नई सुपर किंग्स
- व्यंकटेश अय्यर : 23.75 करोड, कोलकाता नाईट रायडर्स
- फिल सॉल्ट : 11.50 करोड, रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु
- क्विंटन डी कॉक : 3.60 करोड, कोलकाता नाईट रायडर्स
- ग्लेन मॅक्सवेल : 4.20 करोड, पंजाब किंग्ज
- ईशान किशन : 11.25 करोड, सनराइजर्स हैदराबाद
5 खेळाडूंवर 100 कोटी खर्च : ऋषभ पंतला 27 कोटींना लखनऊनं विकत घेतलं. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याशिवाय श्रेयस अय्यरला 26.75 कोटींना विकत घेतलं. या लीगच्या इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटींना विकत घेतलं. पंजाबने अर्शदीपला आरटीएमखाली घेतलं. तसंच लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही 18 कोटींना विकत घेतलं. तर इंग्लंडच्या जोस बटलरला गुजरात टायटन्सनं विकत घेतले. त्याला 15.75 कोटी रुपये मिळाले. बटलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. या सर्व खेळाडूंची एकूण किंमत 100 कोटींहून अधिक आहे.