नवी दिल्ली Jonty Rhodes LSG : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स गेल्या काही दिवसांपासून भारतात होता. रोड्सनं आपल्या भारत दौऱ्यात दिल्ली ते मुंबई प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. रोड्सनं एका पोस्टद्वारे सांगितलं की, मुंबई ते दिल्ली प्रवास करताना त्यांना कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला. प्रथम त्याच्या विमानाला मुंबई विमानतळावर उशीर झाला, त्यानंतर विमानात बसल्यानंतर रोड्सला त्याची सीट तुटल्याचं समजलं. रोड्सची गणना क्रिकेट विश्वातील महान क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. 1992 च्या विश्वचषकात रोड्सनं पाकिस्तानी फलंदाज इंझमाम उल हकला ज्या प्रकारे धावबाद केलं ते आजही चाहत्यांच्या मनात आहे.
रोड्सनं काय केली पोस्ट : रोड्सनं त्याच्या सोशल मीडियावर लिहिलं की, 'माझं दुर्दैव विमान प्रवासादरम्यान कायम आहे. एअर इंडियाच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला दीड तासांपेक्षा जास्त उशीर झाला. पण आता मी विमानात चढल्याबरोबर सूट फॉर्मवर स्वाक्षरी केली आणि मी मान्य करतो की माझी सीट तुटली आहे. मी पुढील 36 तासांची वाट पाहत नाही कारण मला दिल्लीहून मुंबईला परतायचं आहे आणि नंतर केपटाऊनला जाणारी फ्लाइट पकडायची आहे.'