नवी दिल्ली MI VS DC IPL 2024 :आयपीएल 2024 मधील 20 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. सामन्यापूर्वी झालेला टॉस दिल्ली कॅपिटल्सनं जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मानं 49, टीम डेव्हिडनं 45, ईशान किशननं 42, तिलक वर्मानं 6, हार्दिक पंड्यानं 39 तर रोमॅरियो शेफर्डनं अवघ्या 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या. रोमॅरियो शेफर्डनं शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 32 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना मुंबईच्या 5 विकेट्स घेण्यात यश आलं. अक्षर पटेल आणि अन्रीचं नॉर्टेजने प्रत्येकी 2 तर खलील अहमदने एक विकेट घेतली. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 234 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं होतं.
जेराल्ड कोएत्झीकडून 3 विकेट्स : दिल्ली कॅपिटल्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करताना डेव्हिड वॉर्नरनं 10, पृथ्वी शॉनं 66 , रिषभ पंतनं 1, अभिषेक पोरलने 41, ट्रिस्टन स्टब्सनं 71 आणि अक्षर पटेलनं 8 धावांची कामगिरी केली. परंतु मुंबई इंडियन्सनं विजयासाठी दिलेले आव्हान दिल्ली कॅपिटल्स पूर्ण करू शकली नाही आणि त्यांचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दिल्ली कॅपिटल्सच्या 8 विकेट्स घेण्यात यश आलं होतं. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 20 व्या षटकात 34 धावांची गरज होती. डीसीचे फलंदाज 6 चेंडूत 34 धावा करू शकले नाहीत आणि केवळ 7 धावा करू शकले आणि सामना 28 धावांनी गमावला. या षटकात डीसीला प्रथम ललित यादव (3) आणि त्यानंतर पदार्पण करणाऱ्या कुमार कुशाग्रा (0) आणि जे रिचर्डसन (2) यांच्या रूपाने तीन झटके बसले. यासह जेराल्ड कोएत्झीनेही 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
फक्त ८ धावा : जसप्रीत बुमराहने 17 व्या षटकात फक्त ८ धावा दिल्या, त्यामुळे एमआयचा विजय जवळपास निश्चित झाला. कारण दिल्लीला शेवटच्या 12 चेंडूत 55 धावा करायच्या होत्या. शेवटच्या दोन षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण ठेवले होते, त्यामुळे डीसीला 29 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरच्या षटकात जेराल्ड कोएत्झीने दिल्लीच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.