महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

यंदाच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चांगलं यश मिळेल; ऑलिम्पिक नेमबाज अंजली भागवत यांना विश्वास - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करुन अधिक पदकं जिंकतील, अशी खात्री ऑलिम्पिक नेमबाज अंजली भागवत यांनी पुण्यात व्यक्त केली.

Paris Olympics 2024
ऑलिम्पिक महोत्सवाचं उद्घाटन (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 8:56 PM IST

Updated : Jul 26, 2024, 10:00 PM IST

पुणे Paris Olympics 2024 : भारतीय खेळाडूंनी गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अतिशय चांगली तयारी केली. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवलं. हे लक्षात घेतलं तर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी खात्री ऑलिम्पिक नेमबाज अंजली भागवत यांनी पुण्यात व्यक्त केली.

ऑलिम्पिक नेमबाज अंजली भागवत यांची प्रतिक्रिया (Source : ETV Bharat Reporter)

ऑलिम्पिक महोत्सवाचं आयोजन : पॅरिसमध्ये सुरू झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेनिमित्तानं डेक्कन जिमखाना क्लबनं आयोजित केलेल्या ऑलिम्पिक महोत्सवाचं उद्घाटन अंजली भागवत व ऑलिम्पिक बॅडमिंटनपटू निखिल कानेटकर यांच्या हस्ते झालं. डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सरचिटणीस मिहीर केळकर आणि वित्त सचिव गिरीश इनामदार यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानिमित्तानं ऑलिम्पिक विषयक आयोजित केलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

काय म्हणाल्या भागवत :भागवत यांनी यावेळी सांगितलं की, "यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आपले अनेक युवा खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्यामध्ये चमक दाखवण्याची खूप ऊर्जा निर्माण झाली आहे. सुदैवानं गेल्या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी सातत्यपूर्ण चमक दाखवली आहे‌. त्याचा फायदा त्यांना ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे मिळणार आहे. केंद्र शासनानं तसंच वेगवेगळ्या राज्यातील शासनांनी खेळाडूंना उत्तम प्रकारच्या सुविधा, आर्थिक सहकार्य चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळं अतिशय निश्चिंत मनानं या खेळाडूंनी सराव केला आहे. त्याचं प्रतिबिंब यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे दिसेल."

अधिक पदकं जिंकतील : क्रीडा विषयक प्रदर्शनाबद्दल कौतुक व्यक्त करत कानेटकर यांनी सांगितलं, "अशा उपक्रमांमधून खेळाडूंबरोबरच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळणार आहे. खेळाडूंच्या यशामध्ये पालकांचाही मोठा वाटा असतो. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची खूप चांगली तयारी झाली आहे. त्यामुळं गतवेळच्या ऑलिम्पिकच्या तुलनेमध्ये यंदा भारतीय खेळाडू अधिक चांगली पदकं जिंकून आणतील अशी मला आशा आहे. प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी आणि सामन्याच्या वेळी मानसिक दृष्ट्या भक्कम आणि खणखर असणं आवश्यक आहे. त्याचीही आपल्या खेळाडूंनी मानसिक तंदुरुस्ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली आहे‌. त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे पदक जिंकण्यासाठी होणार आहे."

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग ड्रॉ जाहीर; स्टार बॉक्सर निखत झरीन आणि लोव्हलिनासमोर कडवं आव्हान - Paris Olympics 2024
Last Updated : Jul 26, 2024, 10:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details