महाराष्ट्र

maharashtra

टीम इंडिया 'विजयी भव'; भारताच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना, कुठे होमहवन तर कुठे आरती - T20 World Cup 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 12:54 PM IST

India vs South Africa : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 विश्वचषक क्रिकेट 2024 चा फायनल सामना आज अमेरिकेतील बार्बाडोस येथे रंगणार आहे. या सामन्याबाबत देशात प्रचंड उत्साह आहे. 'टीम इंडिया'च्या काही पाठीराख्यांनी 'टीम इंडिया'च्या विजयासाठी प्रार्थना करत मंदिरात पूजा-अर्चनेला सुरुवात केली आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (ETV Bharat)

T20 World Cup India vs South Africa Final: भारतीय संघानं उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून टी-20 विश्वचषक क्रिकेट 2024च्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. आज या स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. विश्वचषकावर भारताचं नाव कोरण्यासाठी खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत, तर दुसरीकडे 'टीम इंडिया'चे चाहते संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. 'टीम इंडिया'च्या विजयासाठी चाहते प्रार्थना, होमहवन तर आणि आरती करत आहेत.

2013 पासून भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला हा दुष्काळ संपवायचा आहे. याआधी 2023 मध्ये भारताला दोनदा संधी मिळाली होती, मात्र दोन्ही वेळा भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आधी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. नंतर ऑस्ट्रेलियानं पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पराभव केला. यावेळी तसं होऊ नये, यासाठी चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना करायला सुरूवात केली आहे. यासंदर्भातले व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयासाठी वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरासमोरील गंगा द्वार येथे गंगा आरती करण्यात आली. यासोबतच अनेक चाहत्यांनी 'टीम इंडिया'च्या विजयासाठी हवनही केलं.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भारताच्या विजयासाठी मंदिरात पूजा आणि आरती पाहायला मिळाली. यावेळी चाहत्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांसारख्या अनेक खेळाडुंचे पोस्टर्स हातात घेत मंदिरात आरती केली. यावेळी भारत माता की जय आणि 'टीम इंडिया'च्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

यूपीतील प्रयागराजमध्येही भारताच्या विजयासाठी भजन-कीर्तन करण्यात आलं. आजच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं ग्रुप स्टेजमध्ये 3 विजय, सुपर-8 टप्प्यात 3 विजय आणि उपांत्य फेरीत इंग्लंडवर विजय मिळवून आपली अपराजित मोहीम कायम ठेवलीय. यासोबतच दक्षिण आफ्रिकेनंही ग्रुप स्टेजमध्ये 4 विजय, सुपर-8 टप्प्यात 3 विजय आणि सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला पराभूत करुन आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली आहे. फायनलमध्ये जो संघ बाजी मारणार, त्या संघाच्या नावावर एकही सामना न गमावता टी-20 विश्वचषक जिंकल्याचा रेकॅार्ड होणार आहे.

हेही वाचा

  1. रोहितसेना इतिहास बदलणार? भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान; कोणत्या संघाचा वरचष्मा? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड - T20 World Cup 2024 Final
  2. टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; सामना न झाल्यास कोण होणार विश्वविजेता? - T20 World Cup Final
  3. भारताच्या शेफाली वर्मानं रचला इतिहास...! महिलांच्या कसोटी सामन्यात केला 'हा' भीम पराक्रम - INDW vs SAW Only Test
  4. टी20 विश्वचषक 2024 : कर्णधार म्हणून रोहित शर्माचा मोठा विक्रम, विराट कोहलीबाबत केलं मोठं वक्तव्य - Rohit Sharma Records

ABOUT THE AUTHOR

...view details